ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण पश्चिमेतील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात मुदत संपलेल्या कोल्ड्रिंकची विक्री सुरू असल्याचा गंभीर प्रकार नागरिकांनी उघडकीस आणला आहे. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याबद्दल नागरिकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आचार्य अत्रे रंगमंदिर हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात असते. असाच एक प्रकार काल गुरुवारी एका गुजराथी नाटकादरम्यान नाटकाच्या झालेल्या मध्यंतरा वेळी घडला. नाट्य रसिक कोल्ड्रिंक घेण्यासाठी कॅन्टीन मध्ये गेले असता त्या ठिकाणी एक्सपायरी डेट संपलेल्या कोल्ड्रिंक च्या बॉटल नाट्य रसिकांना देण्यात आल्या. फ्रिजमध्ये देखील असलेल्या बॉटलची देखील एक्सपायरी डेट संपलेली होती. यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचे सांगत नागरिकांनी संताप व्यक्त केला. या घटनेमुळे अत्रे रंग मंदिराच्या व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला असून महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याप्रकरणी केडीएमसी प्रशासनाने लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहे.
.jpg)




Post a Comment
0 Comments