Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

माणिक मोती कार्यक्रमाला कल्याणकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद




   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण मध्ये राष्ट्रसेविका समितीच्या हातात हात घालून चालणारे अशी ओळख असलेले उज्वला मंडळ यंदा 76 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. विविध सामाजिक धार्मिक शैक्षणिक वैद्यकीय उपक्रम करीत असताना कल्याणकरांना थोडी मनोरंजनाची मेजवानी पण द्यावी असा मानस ठेवून मंडळ वर्षातून एकदा मनोरंजनाचा कार्यक्रम करत असते.


 यंदा सुप्रसिद्ध गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्ष ही संधी साधून तसेच सुप्रसिद्ध कलाकार अशोक हांडे यांना मिळालेला प्र. के. अत्रे पुरस्कार यांची सांगड घालून कल्याणच्या अत्रे  नाट्य मंदिरात चौरंगनिर्मित अशोक हांडे सर्वेसर्वा असलेला माणिक मोती या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या सुमधुर बहारदार गाण्यांच्या कार्यक्रमाचा आस्वाद कल्याणकर रसिक श्रोत्यांना मिळाला. माणिक वर्मांच्या मुलींचा यातील सहभाग हेही या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते. त्यांना इतर कलाकार गायक वादक यांची छान साथ मिळाल्यामुळे कार्यक्रम रंगतदार झाला. हा कार्यक्रम दृकश्राव्य पद्धतीने सादर झाला. कल्याणच्या रसिक आणि दर्दी प्रेक्षकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 उज्वला मंडळांनी सुगंधित अत्तर लावून रसिकांचे केलेले स्वागत आणि कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन याचे सर्वांनी खूप कौतुक केले. उज्वला मंडळाच्या सर्वच कार्यक्रमांना कल्याणकर रसिक नेहमीच चांगला प्रतिसाद देत आहेत. तसाच यापुढेही देतील असा विश्वास आहे त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद व चौरंगाच्या सर्व कलाकारांचे सुद्धा आभार. उज्वला मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम सफल करण्यात भरपूर मेहनत घेतली. असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षा सुनीता केळकर यांनी दिली.


Post a Comment

0 Comments