Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

राज ठाकरे यांनी घेतला कल्याण डोंबिवलीचा धावता आढवा निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे दिले आदेश


                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील कामाला लागली आहे. याचाच भाग म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कल्याणमध्ये धावती भेट देऊन कल्याण डोंबिवलीतील कार्यकर्त्यांकडून पक्षाचा आढावा घेतला. कल्याण पश्चिमेतील हॉटेल गुरुदेव ग्रँड येथे राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत राज ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना निवडणुकीसाठी कोण कोण इच्छुक आहेत याबाबत विचारणा केली. निवडणुकीत युती होईल न होईल पण निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले. यानंतर अवघ्या काही मिनिटांत हि बैठक आटोपती घेत घेत राज ठाकरे मुंबईच्या दिशेने रवाना झाले.


 यावेळी मनसे नेते माजी आमदार राजू पाटील, प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार प्रकाश भोईर,  ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, मनसे महिला सेना राज्य सचिव उर्मिला तांबे, महिला शहर अध्यक्षा कस्तुरी देसाई, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष विनोद केणे, माजी शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई, उपशहर अध्यक्ष गणेश चौधरी आदींसह इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.   


Post a Comment

0 Comments