Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कोळसेवाडी पोलिस ठाणे राडा प्रकरण; गणपती गायकवाड यांच्यासह पाच जण निर्दोष

 

                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

साल २०१४ मध्ये कल्याण येथील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात राडा केल्याच्या प्रकरणात माजी आमदार गणपती गायकवाड आणि शिवसेनेचा पदाधिकारी निलेश शिंदे यांच्यासह अन्य तिघा जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

मात्र सध्या गणपत पाटील आणि कुणाल पाटील उल्हासनगरात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये माजी आमदार महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी कारागृहात आहेत.

कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याच्या प्रकरणात माजी आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना पदाधिकारी निलेश शिंदेसह अन्य तिघा जणांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.2014 मध्ये कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये राडा केल्याचा गुन्हा पोलिसांनी त्यांच्यावर दाखल केला होता. या प्रकरणात माजी आमदार गणपत गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख निलेश शिंदेसह अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात कल्याण न्यायालय सुरू सुनावणी सुरु होती.

विशेष म्हणजे या प्रकरणात पोलिसांनी स्वतः हा गुन्हा नोंदवून या आरोपींवर दोषारोपपत्र दाखल केले होते. मात्र पुराव्यांअभावी कल्याण न्यायालयाने गणपत गायकवाड सह इतर चार ही आरोपींची आज निर्दोष मुक्तता केली. सध्या गणपत गायकवाड आणि कुणाल पाटील हे उल्हासनगरमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या केबिनमध्ये माजी आमदार महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणात कारागृहात आहेत. मात्र 2014च्या या गुन्ह्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकाविरोधात आंदोलन केल्याचा राग मनात धरून खोटा गुन्हा दाखल केल्याचा बचाव पक्षाचा युक्तिवाद झाल्याने कल्याण न्यायालयाने या पाच आरोपींचा निर्दोष मुक्तता केली आहे.

महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबार प्रकरण

उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये माजी आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे कल्याण अध्यक्ष महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. महेश गायकवाड आणि इतर दोघे वरिष्ठ पोलिस निरीक्षक (पीआय) अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये बसले होते.त्यावेळी गणपत गायकवाड आणि त्याचे सहकारी केबिनमध्ये घुसले आणि महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. महेश गायकवाड यांच्या शरीरात सात गोळ्या घुसल्या होत्या. या प्रकरणात पोलिसांनी गणपत गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात हत्या करण्याचा प्रयत्न आणि इतर कलमाखाली गुन्हा दाखल करीत खटला दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments