ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
डोंबिवलीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते, माजी जिल्हा अध्यक्ष अर्जुन भाऊ चौधरी यांच्या घरी गेल्या पन्नास वर्षापासून नवसाला पावणारा गणपती बाप्पा विराजमान झाले .अर्जुन बुवा चौधरी यांच्या आईने गणरायाला नवस केला होता. आणि तेव्हापासून त्यांच्या घरी दरवर्षी भक्तिभावाने गणपती बाप्पाची स्थापना व पूजाअर्चा केली जाते.
यावर्षी या गणेशोत्सवाला पन्नास वर्षे पूर्ण झाली असून या सुवर्ण महोत्सवी साजरा करण्यात आला. यावेळी या गणेशोत्सवाला अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली. यावेळी सत्यनारायण महापूजेचे आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मित्रपरिवार,नागरिक व अनेक राजकीय नेते उद्योजक समाजसेवक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले.यावेळी अर्जुन बुवा चौधरी, संतोष अर्जुन चौधरी, अजिंक्य अर्जुन चौधरी, विजय अर्जुन चौधरी पूर्ण चौधरी कुटुंब यावेळी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले.
Post a Comment
0 Comments