ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर
गेल्या 34 वर्षापासून श्री साईनाथ मित्र मंडळ डोंबिवलीचा मानाचा जाधव वाडीचा महाराजा हा नवसाला पावणारा गणपती भाविकांच्या भक्तीचा केंद्रबिंदू ठरला आहे. या महाराजाच्या दर्शनासाठी दरवर्षी हजारो भावी मोठ्या श्रद्धा आणि भक्ती भावाने गर्दी करतात
या मंडळाचे अध्यक्ष दिनेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या मध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले गेले.सहभागी होणाऱ्या प्रत्येक मुलाला आकर्षक बक्षीस देण्यात आलेत्याचा प्रमाणे यंदाही महाप्रसाद म्हणून भंडारा आयोजित केला होता.त्या मध्ये परिसरातील हजारो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
दरवर्षी श्री गणेश विसर्जनाची मिरवणूक सायंकाळी सहा वाजता काढण्यात येते .मात्र यावर्षी विशेष बदल करून दुपारी बारा वाजता विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे त्यामुळे सर्व भाविकांनी या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन दिनेश जाधव यांनी केले.त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि मिरवणूक उत्साहात भक्तिभावाने पार पडली.
Post a Comment
0 Comments