Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मनसे विभाग अध्यक्ष रोहित भोईर यांचा घरगुती गणेशोत्सव वारकरी परंपरेने साजरा

                   ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर 

 भोईर कुटुंबाचा घरगुती दहा दिवसांचा गणेशोत्सव मोठया उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या गणेशोत्सवातील विशेष बाब म्हणजे भोईर कुटुंबातील लहान मुलाने स्वतःच्या हाताने गणरायाची छोटी मुर्ती रंगवून पुजेसाठी बसवली. मुलांच्या या उपक्रमामुळे कौटुंबिक वातावरण अधिकच आनंदमय झाले.बालकाच्या भक्तीभावाची झलक सर्वांनीच अनुभवली.

 गणरायाच्या आगमनानंतर दररोज महाआरती, मंत्रोच्चार, भजन किर्तन, हरिपाठ असे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वारकरी परंपरेनुसार टाळ मृदंगाच्या गजरात झालेल्या दिंडी व अभंग गायनामुळे संपूर्ण घर भक्तीरसाने भारावून गेले. यंदाचा गणेशोत्सव केवळ धार्मिक कार्यक्रमापुरता मर्यादित न ठेवता अनेक सामाजिक उपक्रमातूनही साजरा करण्यात आला. समाजातील गरजूंसाठी मदतकार्य, पर्यावरण जनजागृती असे अनेक उपक्रम राबविण्यात आले. नवव्या दिवशी सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

या उत्सवाचे आयोजन विठोबा गुलाबराव भोईर, मनसे विभाग अध्यक्ष रोहित गुलाबराव भोईर, समाजसेविका प्राजक्ता रोहित भोईर, संजय गुलाबराव भोईर, हर्शला संजय भोईर, दिनेष गुलाबराव भोईर, अपर्णा दिनेष भोईर, कैलास बाळू भोईर, कल्पना कैलास भोईर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. 

गणरायाच्या दर्शनासाठी मित्रपरिवार, नातेवाईक, मनसे कार्यकर्ते पदाधिकारी, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments