ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकी संदर्भात प्रभाग रचनांबाबत हरकती सुनावणी होती. या सुनावणी दरम्यान २७ गावांच्या सर्व पक्षीय हक्क सरंक्षण संघर्ष समितीने मोठ्या प्रमाणात हरकती दाखल केल्या होत्या या हरकतींवर देखील सुनावणी झाली. यावेळी या समितीचे अध्यक्ष खासदार सुरेश म्हात्रे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे, माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, उपाध्यक्ष सत्यवान म्हात्रे यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी, २७ गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते.
कल्याण-डोंबिवली महापालिका प्रभाग रचना सुनावणीदरम्यान २७ गावांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. या गावांमधील ३ हजारांहून अधिक हरकतींची दखल घेतली नसल्याचा आरोप करत खासदार सुरेश म्हात्रे आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी आयुक्तांशी चर्चा केली. त्यांनी स्पष्ट मागणी केली की, २७ गावे केडीएमसीत समाविष्ट न करता प्रभाग रचना व्हावी आणि या गावांमध्ये निवडणूक घेऊ नये. हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आयुक्तांनी याबाबत निवडणूक आयोगाला माहिती देण्याचे आश्वासन दिले आहे.
कल्याण डोंबिवली सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनापैकी २६४ हरकती आणि सूचनांवर बुधवारी सुनावणी पार पडली. महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेले प्राधिकृत अधिकारी यांनी सुनावणी घेतली. यात २७ गावांतील सर्व पक्षीय हक्क सरंक्षण संघर्ष समितीने २७ गावं वगळून प्रभाग रचना करावी अशी मागणी कायम ठेवली आहे. त्याला शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, कांग्रेस आणि मनसे यांनी पाठिंबा दिला. सर्व पक्ष सरंक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष खासदार सुरेश म्हात्रे यांनी निवडणूक प्राधिकृत अधिकारी यांची सुनावणी दरम्यान भेट घेऊन एकूण हरकती २६४ नसून फक्त २७ गावातून ३६०० हरकती आल्या आहेत हे निदर्शनात आणून दिले. केडीएमसी आयुक्तांनी बाब मान्य करत या हरकतीची दखल घेण्याचे मान्य केले.
Post a Comment
0 Comments