ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
मोठा गाव खाडी परिसरात कल्याण तहसीलदार पथकाने गस्ती दरम्यान दोन बार्ज व दोन सक्शन पंप अवैध रेती उत्खनन करताना आढळल्याने धडक कारवाई चा बडगा उगारीत २ बार्ज व एक स्कंशन पंप गैस कटर ने तोडण्यात आले. तर एक स्कंशन पंप जागीच बुडवित सुमारे 34 लाखांची साधनसामग्री नष्ट केल्याची कारवाई मंगळवारी केली.
तहसील सूत्रांकडून प्राप्त माहिती नुसार मंगळवारी तहसीलदार कल्याण यांच्या पथकाने उल्हास खाडी भागातील मुंब्रा खाडी ते मोठागाव खाडी गस्त केली असता. मोठा गाव खाडी परिसरामध्ये दोन बार्ज व दोन सक्शन पंप अवैध रेती उत्खनन करीत असताना आढळून आले. निवासी नायब तहसीलदार कल्याण, अप्पर कल्याण मंडळ अधिकारी व शिपाई कोतवाल यांनी मोठा गाव डोंबिवलीच्या खाडीत अवैधरित्या वाळू उपसा करत असणाऱ्या २ बार्ज व २ सक्शन पंप ताब्यात घेतले.
कारवाई दरम्यान एक सक्शन पंप जागेवरन बोटीतील लोकांनी पाणी सोडल्याने ओढून आणणे शक्य नसल्याने जागीच बुडवला असून, कारवाई करत असताना बोटीवरील लोकांनी उड्या मारुन पळ काढला. तर राहिलेल्या २ बार्ज व एक सक्शन पंप गॅस कटर ने तोडण्यात आले. या कारवाई मध्ये अवैध रेती उत्खनना करता वापरल्या जाणाऱ्या सुमारे 34 लाखांची साधनसामग्री नष्ट करण्यात आली.
कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,अवैध रेती उपसा प्रकरणी खाडी भागात कारवाई सुरू असते आजच्या कारवाईत अवैध रेती उत्तखन्न प्रकरणी रात्री उशीरा पर्यंत कारवाई करीत अवैध रेती उत्तखन्न करणारी 34लक्ष रु साधन सामुग्री नष्ट करण्यात आली असून यापुढे ही अवैध रेती उत्तखन्न कारवाई तीव्र केली जाणार आहे.
कल्याण तहसीलदार पथकाच्या अवैध रेती उत्तखन्न कारवाई बडग्यामुळे अवैध रेती उत्तखन्न करणार्या रेती माफियांचे धाबे दणाणले असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे.
Post a Comment
0 Comments