6 महिला व 1 पुरूष बांग्लादेशी नागरिकाचा
समावेश
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
मंगळवारी सायंकाळी 6 वा.चे सुमारास सपोनि भुजबळ व तपास पथकाचे पोलीस अंमलदार कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये ६ महिला संशयास्परित्या फिरत असताना मिळुन आल्या. या महिलांना म.पो.कॉ. धनगर यांच्या मदतीने ताब्यात घेउन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्या बांग्लोदश येथील असल्याचे सांगुन त्यांच्याकडे भारतामध्ये रहाण्याबाबतचा कोणताही वैध परवाना नसल्याचे सांगितले.
या 6 महिलांची महिला पोलीस अंमलदार यांच्या मदतीने अंगझडती घेतली असता त्यांच्या कडे असणारे मोबाईलमध्ये ईमो अॅप व ८८ या सिरीयलने सुरू होणारे मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअॅप द्वारे चॅटींग व कॉलींग केल्याचे दिसुन आले. तसेच काही महिलांकडे बांग्लादेश मधील जन्म प्रमाणपत्र, बांग्लादेश नॅशनल आय.डी. कार्ड असे बांग्लादेश नागरिक असलेबाबत पुरावे मिळुन आले. तसेच बुधवारी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एक अनोळखी इसम मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेउन त्याच्याकडे विचारपुस करता त्याने तो बांग्लादेशी नागरिक असल्याचे कबुल केले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये बांगलादेशातील बर्थ सर्टिफिकेट कागदपत्र मिळुन आले.
या बांगलादेशी नागरिकांमध्ये शिपा बलून पठाण, शर्मिन मोने रुल इस्लाम, रीमा सागर अहमद, सुमया अबुल कासिम, पौर्णिमा मोहम्मद सुलेमान अख्तर, जोया जास्मिन मतदार, रॉकी रहीम बादशाह यांचा समावेश आहे. या सर्वांकडे विचारपुस केली असता ते बांग्लादेशातुन छुप्या मार्गाने भारतामध्ये प्रवेश करून तेथुन ट्रेनने मुंबई येथे आले असल्याचे कबुल केले. याबाबत पोलीस पुढील योग्य ती कार्यवाही करत आहेत. हि कामगिरी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलीरामसिंग परदेशी, पोनि विजय नाईक, तपास पथकातील अधिकारी सपोनि स्वप्नील भुजबळ, पोउपनि जानुसिंग पवार, पो. हवा. साळुंखे, तडवी, पो.कॉ. वडगावे, कोळी, जाधव यांनी केली आहे.
Post a Comment
0 Comments