ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वार्ताहर
नवी मुंबई येथील कलासाधना सामाजिक संस्था, यांच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रस्तरीय प. पू. साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार, समाजभुषण पुरस्कार, व जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालेले असून , पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि.०७ सप्टेंबर २०२५ रोजी कराडी समाज हॉल, कामोठे, नवी मुंबई येथे मुख्य अतिथी व शुभहस्ते मा. श्री. अच्युत पालव पद्मश्री (भारत सरकार२०२५) सुप्रसिद्ध जेष्ठ आंतरराष्ट्रीय सुलेखनकार,प्रमुख पाहुणे म्हणूनदिगंबर तायडे पद्मश्री पुरस्कार ( नामांकन २०२६) दानशूर व्यक्तिमत्व, कॅप्टन मनोज भामरे माजी लष्करी अधिकारी (भारतीय लष्करातील शॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड अधिकारी)रामजीत (जितू)गुप्ता(मुख्य तपास अधिकारी, अँटी पायऱसी सेल मुंबई)प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सपन्न होणार आहे.
या पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून ८३०अर्ज प्राप्त झाले होते, त्यातून ५०विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे, पुरस्कार स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, आकर्षक मेडल श्याम ची आई पुस्तक देवून सन्मानित करण्यात येणार आहे, असे आयोजक संस्थेच्या अध्यक्ष मेघा महाजन यांनी सांगितले. पुढील पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या नावांची घोषणा या वेळी बोलतांना त्यांनी केली.
प. पू. साने गुरुजी जीवन गौरव पुरस्कार
उल्हास देशमुख, शारदा राणा,राजेंद्र जावळे,फुंदे शरदराव रघुनाथ.
प. पू. साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार
उषा सिंह,गोरे मनेश बब्रुवान, कृष्णा पाटील,आसिया परविन अब्दुल रहमान,राकेश महाजन,सुरेश जाधव,अर्चना मारकड,महेश जाधव, साधना कोपनर,.राजन राठोड,जयसिंग बेटकर,विठ्ठल म. मणूरे, सुनील म्हात्रे.पुनम देसाई,मानसी चव्हाण.सिताराम प्रभु,धनाजी थिटे,किरण सरोदे, ऋता भामरे.नुरी गुलाम मोहम्मद मुस्तफा,मंदार चोरगे. के. परमेश्वर,नितीन मोहरीर, स्मिता प्रल्हाद जोशी,संतोष साखरे,श्रद्धा बनसोडे,चंद्रशेखर साळवे, नरेश लोहार.सुरेश वाघमारे,नॅन्सी मुथु स्वामी,काजल सुर्वे,विजय वाघेला
प. पू. साने गुरुजी समाज भूषण पुरस्कार
अजय जिरापुरे,विलास खंडेराव समेळ , गोरखनाथ पोळ,अनिल पाटील,संध्या भांगरे,सत्यवती खळदकर,रवींद्र माहिमकर,विपीन राऊत,सुमन देसाई,दिलीप मोकल,अनंत देवघरकर,अमित कांबळे,राजेंद्र गवळी, परशुराम घाडगे.
Post a Comment
0 Comments