मानाच्या मेळा गणपतींचे जल्लोषात विसर्जन....
कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने श्रद्धापूर्वक निरोप
पोलीस उपायुक्त, केडीएमसी अतिरिक्त आयुक्तांनी केले ढोल वादन
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
स्वातंत्र्य पूर्व काळा पासून आजमिती पर्यंत गेली सव्वाशे वर्ष अविरत सुरू असलेली मेळा गणपतीची परंपरा असलेल्या मेळा गणपतींचे विसर्जन बुधवारी परंपरेनुसार झाले. पुर्वी मुंबई-पुण्यातील गणेशदर्शनाला निघायचे, अशी परंपराच कल्याणमध्ये सुरू झाली. भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी पासून ते एकादशी पर्यंत मेळा च्या गणपतीची स्थापना करून उत्सव साजरा केला जातो व या मेळा गणपतींचे एकादशीला मोठ्या उत्साहात गाजत वाजत विसर्जन केले जाते.
आचार्य अत्रे रंगमंदिरा पासून निघणाऱ्या या विसर्जन मिरवणुकीत तेली मंडळी, वैश्य समाज मंडळ, धनगर समाज मंडळ, शाहू छत्रपती गणेशोत्सव मंडळ, नवजीवन गणेशोत्सव मंडळ, उदय गणेश मंडळ, बाल गणेश मंडळ, बच्चीराम तेली गणेश मंडळ, कुंभारवाडा गणेश मंडळ, गुजराती समाज मंडळ, हनुमान प्रासादिक गणेशोत्सव मंडळ, गजानन प्रासादिक मंडळ या १२ गणपतींचा सहभाग असतो. या गणपतीच्या मिरवणुका ढोल-ताशाच्या गजरात ठरवून दिलेल्या मार्गाने गणेश घाटावर मार्गस्थ होत असतात.
पारंपरिक वाद्यांचा समावेश असलेल्या या मेळा गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा पोलीस बंदोबस्त असतो. यंदा मेळा गणपती विसर्जन मिरवणुकीत पोलीस परिमंडळ 3चे पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे, केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी देखील ढोल वादन करून गणेशोत्सवाचा आनंद घेतला.
तसेच दुर्गाडी चौकात परंपरेनुसार कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विसर्जनासाठी येणाऱ्या प्रत्येक गणेश मंडळाचे स्वागत करून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.येणाऱ्या प्रत्येक गणपतीचे मंडळाच्या वतीने पुष्पवृष्टी करून श्रद्धेने निरोप दिला गेला.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सागर भालेकर,विनोद केणे,यांच्या सह व्यासपीठावर गणेशोत्सव महामंडळाचे संस्थापक अभिमन्यू गायकवाड, प्रदीप नातू, विजय कडव, राजा सावंत, मिलिंद सावंत, सुभाष पेणकर, कांचन कुलकर्णी, नयना भोईर, वैभव हरदास,
गणेश चौधरी, स्वाती कदम, रमाकांत चौधरी, सुनील डाळींबे सचिन पोपलाइतकर, राहुल कासारे, यशोदा माळी, सतीश बनसोडे, किरण गायकवाड, शाम आवारे, राजीव भोईर यांच्या सह गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments