कंत्राटदाराला दिलेली अभ्यासिका
महापालिकेने ताब्यात घेण्याची केली
मागणी
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याणच्या कै. प्रकाश परांजपे अभ्यासिकेत येणा-या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कंत्राटदार मनमानी पद्धतीने हजारों रूपयांची फी आकारणी करत आहेत. यामुळे गरीब गरजू विद्यार्थ्यांची लूट होत आहे त्याच बरोबर हजारो रुपयांत असणारी फी गरीब विद्यार्थ्याना परवडत नाही परिणामी त्यांच्या अभ्यासाचे नुकसान होत आहे. ही लूट थांबविण्यासाठी शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विधानसभा सहसंघटक रुपेश भोईर यांच्या मार्फत महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार करण्यात आला होता. पण त्या पत्रांना केराची टोपली दाखवत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून काही समाधानकारक पाऊल उचलण्यात आले नाही. याचा विरोध करत कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महानगरपालिका मुख्यालया पर्यंत शिवसेना ठाकरे गटाकडून कडून भीक मांगो आंदोलन करण्यात आले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिके तर्फे २०१० साली सहजानंद चौक येथे कै. प्रकाश परांजपे स्पर्धात्मक परिक्षा प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन करण्यात आले होते. या प्रशिक्षण केंद्राचा उद्देश विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात चांगले शिक्षण मिळावा असा होता. पण हे प्रशिक्षण केंद्र कंत्राटदाराच्या हातात देण्यात येऊन कंत्राटदार विद्यार्थ्यांकडून पंधराशे ते दोन हजारांची मागणी केली जात आहे. हि मागणी योग्य नसल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कल्याण शहरात भीक मांगो आंदोलन करून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला आर्थिक मदत गोळा करण्यात आली. जमा झालेली ७४१ रुपयांची रक्कम महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात भरून अभ्यासिकेसाठी देणगी देण्यात आली. ज्याने महानगरपालिकेला हे प्रशिक्षण केंद्र चालविण्यास मदत होणार असल्याचे रुपेश भोईर यांनी सांगत, हे केंद्र महानगरपालिकेने स्वतःच्या ताब्यात घेऊन डागडुजी करून चालवावे आणि मनमानी करून जास्त फी मागणा-या कंत्राटदाराला काळया यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली.
Post a Comment
0 Comments