ब्लॅक अँड व्हाईट अंबरनाथ वार्ताहर
"स्वच्छता ही सेवा" या अभियानांतर्गत शहरामध्ये शासनाच्या आदेशानुसार शहरामध्ये एक दिवस,एक तास एक साथ ही थीम घेऊन शहरातील संरक्षित ठिकाण प्राचीन कालीन ऐतिहासिक अंबरनाथ मंदिर परिसरा मध्ये स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. मा. मुख्याधिकारी श्री. उमाकांत गायकवाड, मा. उपमुख्याधिकारी श्री. उमेश राऊत व आरोग्य खाते प्रमुख श्री. राजेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले.
शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी ऐतिहासिक ठिकाणे व अध्यात्मिक ठिकाणे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या अभियानामध्ये स्वच्छता निरीक्षक श्री. आकेश म्हात्रे, श्री. महेश जाधव, श्री. राजू भांडे, श्री. नरेंद्र सावंत तसेच शिव मंदिर हजेरी शेड कामगार, मुकादम व अंबरनाथ गावचे नागरिक, स्वच्छता कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले. सामाजिक प्रतिनिधी देखील सामाजिकउपस्थित होते.
मोहीमेअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंदिर परिसरामध्ये अत्यंत जुन्या साठलेलं कचरा साफ करून स्वच्छ परिसर भक्तगणांना खुला करण्यात आला. स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी शहर निर्माण करण्यासाठी नागरिकांनी अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन सक्रिय योगदान देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
.jpg)









Post a Comment
0 Comments