Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

प्रभारी मुख्याध्यापकाने केला चिमुकलीवर लैंगिक अत्याचार मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; वासनांध मुख्याध्यापकाला बेड्या


डोंबिवली ग्रामीण भागातील संतापजनक

प्रकार

                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

 डोंबिवली जवळील नीळजे ग्रामीण भागातील एका शाळेत प्रभारी मुख्याध्यापकाने सहा वर्षाच्या चिमुकलिवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात वासनांध मुख्याध्यापक महेंद्र खैरनार विरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

डोंबिवली ग्रामीण भागातील निळजे परिसरातील एका शाळेत संतापजनक बाब समोर आली आहे. एका मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. दोन दिवसांपूर्वी त्याने हे कृत्य केले होते. घडल्या प्रकाराबाबत पीडित मुलीने कुटुंबियांना सांगताच कुटुंबीयांनी थेट मानपाडा पोलीस ठाणे गाठले. या वासनांध मुख्याध्यापकाविरोधात मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करत  पोलिसांनी तात्काळ या मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे. महेंद्र खैरनार असे या नराधमाचे नाव असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिली.

दरम्यान या आधी 2019 साली ग्रामस्थांनी या महेंद्र खैरनार हा मुलींसोबत गैरवर्तन करत असल्याची तक्रार गट विकास अधिकाऱ्याकडे करत त्याची बदली करण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.


Post a Comment

0 Comments