ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
वर्धापन दिनाचे औचित्य साधून दि. 07 ऑक्टोबर 2025 रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी.दि.08 ऑक्टोबर रोजी होणार जेष्ठ नागरीकांसाठी अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा 42 वा वर्धापन दिन दि.01 ऑक्टोबर 2025 रोजी येत आहे. तथापि, दि.02 ऑक्टोबर रोजी विजयादशमी असल्यामुळे ,दि. 01 ऑक्टोबर रोजीचा वर्धापन दिन महापालिकेतर्फे मंगळवार, दि.07 ऑक्टोबर 2025 रोजी संपन्न होणार आहे.
सदर दिवशी म्हणजेच दि.07 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सत्रात (दुपारी 3.00 नंतर) वर्धापन दिन कार्यक्रम संपन्न होणार आहे. या दिवशी महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी वर्गातर्फे मुख्य लेखा परिक्षक सुरेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे दि.01 ऑक्टोबर रोजी जेष्ठ नागरीक दिनही साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून दि.08 ऑक्टोबर रोजी जेष्ठ नागरीकांनीच, जेष्ठ नागरीकांसाठी तयार केलेल्या मनोवेधक सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले जाणार आहे. तसेच जेष्ठ नागरीकांसाठी हास्यकवी संमेलनाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण पश्चिम येथे संपन्न होणार आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments