Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शाश्वत-सुरक्षित शहर घडविण्यात गृहसंकुलांची भूमिका महत्त्वाची – महापालिका आयुक्त आयुक्त अभिनव गोयल

               ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

“स्मार्ट शहर म्हणजे केवळ तंत्रज्ञान वा पायाभूत सुविधा नव्हे; तर त्यामध्ये राहणारे नागरिक स्मार्ट असतील तेव्हाच ते शहर खऱ्या अर्थाने स्मार्ट होते. शहर शाश्वत आणि सुरक्षित नसेल, तर त्याची प्रगती शक्य नाही,” असे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आज केले.

महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत - यांत्रिकी) प्रशांत भागवत यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिम येथील मोहन अल्टीझा या  गृहसंकुलात प्रथमच ‘शाश्वत-सुरक्षित इमारत’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन आज सकाळी करण्यात आले त्यावेळी बोलताना आयुक्त अभिनव गोयल यांनी हे प्रतिपादन केले.


या चर्चासत्रात कल्याण-डोंबिवलीतील विविध सोसायट्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. पाणी व्यवस्थापन, सौरऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाण्याचा पुनर्वापर, वृक्ष लागवड, विद्युत सुरक्षा, घनकचरा व्यवस्थापन आणि अग्निसुरक्षा या  महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.या  मुद्द्यांवर प्रभावीपणे काम करणाऱ्या सोसायट्यांना महापालिकेच्या  वतीने मानांकन आणि इतर प्रोत्साहनपर फायदे देण्याचा विचार सुरू असल्याचे आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी स्पष्ट केले मात्र नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सोसायट्यांना सुरुवातीला समज देण्यात येईल आणि भविष्यात आर्थिक दंड लावला जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.

 “नागरिकांच्या छोट्या-छोट्या सवयींमुळे शहरात मोठा बदल घडवून आणता येतो. प्रत्येक सोसायटीपर्यंत हा उपक्रम पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.” असेही ते पुढे म्हणाले.

कार्यक्रमापूर्वी आयुक्त अभिनव गोयल यांनी मोहन अल्टीझा सोसायटीतील घनकचरा व्यवस्थापन, सौरऊर्जा प्रकल्प व सांडपाणी प्रक्रिया केंद्राची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

या समयी उपआयुक्त संजय जाधव, प्रसाद बोरकर, अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत - यांत्रिकी) प्रशांत भागवत, महापालिकेचे स्वच्छता ब्रँड ॲम्बेसेडर डॉ. प्रशांत पाटील,कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ, अशोक घोडे, शैलेश मळेकर, जितेंद्र शिंदे, सहा. आयुक्त प्रिती गाडे, धनंजय थोरात,  मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी, सोसायटीचे अध्यक्ष संजय शहा आणि सचिव मुकेश उत्तमानी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments