Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नवरात्रीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेतून विद्यार्थ्याच्या ज्ञानात भर

 

                        ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

शाहू शिक्षण संस्था संचलित मातोश्री वेलबाई देवजी हरिया कनिष्ठ महाविद्यालय आणि शाहू अध्यापक महाविद्यालय शहाड कल्याण येथे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून सालाबादप्रमाणे यावर्षी ही "पर्व जनजागृतीचे व्याख्यानमाला" घटस्थापनेपासून आयोजन करण्यात आले आहे. गेल्या पंधरा वर्षापासून हा उपक्रम महाविद्यालय घेत आहे.


घटस्थापनेला उपक्रमाचे उद्घाटन डॉ गिरीश लटके साहित्यिक आणि डॉ सुर्यकांत भोसले प्रशासकीय अधिकारी शाहू शिक्षण संस्था पंढरपूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याच दिवशी व्याख्याता प्रा. राकेशकुमार यादव यांचे पर्सनल ब्रॅंडींग स्वत ची ओळख निर्माण करणे या विषयावर व्याख्यान झाले. त्यानंतर "आजची तरुण पिढी आणि मृगजळ" या विषयावर व्याख्यान संदिप पाटील यांनी विविध उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गजानन पाटील यांचे "ग्राहक जागृती भेसळयुक्त अन्न" यावर प्रयोगात्मक माहिती पूर्ण व्याख्यान झाले. डॉ दिनेश गुप्ता यांनी "माईंन्डसेट" यावर आजच्या काळातील विद्यार्थ्यांनी आपले ध्येय सिद्ध करण्यासाठी माईंन्डसेट कसे करावे प्रयोगातून विविध कृतीतून दाखवून दिले.

या व्याख्यानमालेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. प्रमुख उपस्थिती बीएड प्राचार्या वैशाली पाटील, कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या कल्पना सोमनाचे, बी एड कॉलेज व ज्युनियर कॉलेज शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन बबन पाटील, कल्याणी उगले, नम्रता चिंदरकर, श्रेया वरूडकर यांनी केले.


Post a Comment

0 Comments