कै.विवेक पोंक्षे गुरुकुल प्रशाला, नंदुरबार, श्री गणेश काशिनाथ पाठक भाषा अध्ययन केंद्र, नंदुरबार आणि हिंदी सृजनशील संघ नंदुरबार यांनी शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक कार्य केल्याबद्दल दि. 14 सप्टेंबर 2025 रोजी भारतातील महाराष्ट्र राज्यातून निवडलेल्या हिंदी विषयातील सर्वोत्कृष्ट कार्यकर्त्यांना पुरस्कार जाहीर केले. सर्वोत्कृष्ट हिंदी कार्यकर्त्यांमध्ये प्रा.डॉ.सुनील कुलकर्णी (देशगव्हाणकर), केंद्रीय हिंदी संस्थान, आग्राचे संचालक; डॉ. दिनानाथ पाटील, भारतीय सैनिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, खडवली, कल्याण; डॉ.धन्यकुमार बिराजदार (सोलापूर), डॉ.ज्ञानेश्वर सोनार (जुन्नर-पुणे), प्रा.सुधाकर नरहरी शिंदे (वाई-सातारा), डॉ.दत्तात्रय पटेल (शहादा), सौ.गीतांजली शिंदे (चौपले- नंदुरबार), श्री.विशाल मच्छले (नंदुरबार), ममता झा (मुंबई), श्री.कैलास भावसार (साक्री-धुले) प्रा.दीप्ती सावंत (नवी मुंबई) आणि इतर कार्यकर्त्यांचा दि. 10 जानेवारी 2026 रोजी आंतरराष्ट्रीय हिंदी दिनानिमित्त सन्मान करण्यात येणार आहे. त्याची घोषणा विवेक पोंक्षे गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष श्री. अशोक शिंदे, उपाध्यक्ष श्री. गुरुनाथ शिंदे, कोष प्रमुख श्री. देवेंद्र गोरे, श्री. निंबा पाटील, सदस्य अधिवक्ता वर्षा आटले व इतर अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट कार्यकर्त्यांची घोषणा केली. या निवड झालेल्या पुरस्कार विजेत्यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. निवडलेल्या सर्व पुरस्कार विजेत्यांना त्यांनी भारत आणि हिंदी भाषेची जगात सेवा करावी अश्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. या निवड समितीमध्ये डॉ.उमेश शिंदे, श्री गौरीशंकर धुमाळ, डॉ. गणेश पाटील, डॉ. गिरीश पवार, कु. अर्चना धुमाळ आदींचा समावेश होता.
Post a Comment
0 Comments