ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण पूर्वेतील नागरिक सेवा मंडळ संचलित गणेश विद्यामंदिर या शाळेच्या सन 1995-96 ला पास आऊट झालेल्या विद्यार्थ्यांनी स्नेहबंध हा गेट-टुगेदर चा कार्यक्रम प्रसाद बँक्वेट हॉल खडकपाडा कल्याण पश्चिम या ठिकाणी दिनांक 14 सप्टेंबर 2025 रविवारी सेवानिवृत्त झालेल्या शाळेच्या पहिल्या मुख्याध्यापिका श्रीमती स्वाती दुनाखे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता.कल्याणचा प्रसिद्ध फोटोग्राफर आशिष,मंगेश,स्वप्नील,अशा विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आज सोहळ्यात रूपांतर झाले .. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली होती.सर्व विद्यार्थी मिळून औपचारिक पद्धतीने सगळे सोपस्कार करताना दिसत असले तरी अतिशय भावनिक वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडत होता. मुख्याध्यापिकाच नव्हे तर सर्वच शिक्षक व विद्यार्थी यांना गहिवरून येत होते. कारणही तसेच हे सर्व विद्यार्थी ते स्वतः एकमेकांना सुद्धा तब्बल तीस वर्षानंतर भेटत होते. कोण कोणत्या परिस्थितीत कसे आज जमा झाले असतील याचा लेखाजोखा बघितला तर खूप आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. बहुतेक शिक्षक आता सत्तरीला तर काही सत्तरी पार केलेले कशा कशा पद्धतीने उपस्थित झाले होते. शिवाय विद्यार्थिनी व विद्यार्थी सुद्धा यांचे काही वेगळे नव्हते त्यापैकी तर ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी असलेला एक विद्यार्थी झारखंड वरून उपस्थित झाला होता. एक विद्यार्थी दुबई वरून आला होता असे प्रत्येकाचेच वैशिष्ट्यपूर्ण आगमन होते.
त्यानंतर प्रसिद्ध गायिका दुसानी आणि गायक .....यांनी सुमधुर आवाजात काही गाणी म्हणून वातावरण भारावून टाकले होते..आजच्या या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी जणू शिक्षकांसाठी च कार्यक्रम आयोजित केलेला होता असे दिसून आले. कारण प्रत्येकाचे औक्षण करून प्रवेश व त्यानंतर मानाचा फेटा बांधून शाळेचा बॅच लावून प्रत्येक गुरुजनास स्टेजवर बसवून शाल,तुळस व श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा आणि हे सारं ज्या पिशवीत देणार ती पिशवी सुद्धा शाळेच्या नावाने तयार केलेली होती. तत्पूर्वी सर्वच शिक्षकांना म्हणजे पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागाचे अशा सर्वच शिक्षकांना स्टेजवर आमंत्रित करून मुख्याध्यापिकांच्या हस्ते केक कापण्यात आला होता.
आजच्या या कार्यक्रमात श्रीमती दुनाखे मॅडम, सौ.लीला लोहार,सौ स्मिता बोरवणकर,सौ.स्नेहलता झेले, सौ रिता मिस्तरी, सौ स्मिता सोनजे, श्री कैलास पाटील, श्री दिनेश बारूदवाले,आणि शेवटी सौ.ललिता मोरे या सगळ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रत्येकाच्या मनोगतातून अनेक वर्षांच्या आठवणींना उजाळा मिळत होता. आणि सर्व घटना डोळ्यासमोरून एखाद्या फिल्म प्रमाणे सरकत होत्या. प्रत्येक जण त्या भावविश्वात जाऊन भाव विभोर होत होते. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार सौ.पुष्पा शेणवी यांनी स्त्री ही बंदिनी हे गीत गायले आणि सगळ्यांच्या कानांना तृप्ती मिळाली. त्याचबरोबर नंतर विविध खाद्यपदार्थांची रेलचेल मांडून क्षुधातृप्ती सुद्धा आनंदात आणि समाधानात सर्व विद्यार्थ्यांनी मिळून पूर्णत्वास नेली
हे सर्व विद्यार्थी आज अनेक विविध क्षेत्रात उच्चतम कामगिरी बजावत असल्याचे ऐकून आम्ही स्वतःला खूपच भाग्यवान समजत होतो की वाह काय ही आपली मुले आपले नाव आज समाजात उंचावत आहेत.
नागरिक सेवा मंडळाच्या या शाळेसाठी स्वर्गीय रंगराव पाटील यांनी स्वतःला झोकून दिले होते त्यांची मुलेही याच शाळेत शिकली त्यापैकी एक मुलगी जयश्री पाटील जी आज अग्रवाल कॉलेजमध्ये नोकरीला आहे हिने आणि स्वप्नील चौधरी जो एक उच्चतम इंजिनियर आहे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छान केले.
Post a Comment
0 Comments