ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
एसएसटी महाविद्यालयाच्या फुटबॉल संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी करून महाविद्यालयाचा मान उंचावला. कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या फुटबॉल संघाने उपविजेतेपद पटकावले तर मुलांच्या फुटबॉल संघाने तृतीय क्रमांक मिळवला.
खेळाडूंच्या मेहनत, समर्पण आणि संघभावनेमुळे मिळवलेले हे यश उल्लेखनीय ठरले. महाविद्यालयाचे व्यवस्थापन व शिक्षकवर्गाकडून विजयी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून भविष्यातील स्पर्धांमध्येही अशीच झळाळती कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या यशामुळे एसएसटी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुणावला असून इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात प्रेरणा मिळाली आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील क्रीडा विभागाच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी केलेल्या शिस्तबद्ध सराव आणि मेहनतीचे फळ म्हणून हे यश मिळाल्याचे मत प्राचार्यांनी व्यक्त केले.
Post a Comment
0 Comments