ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कला ही केवळ मनोरंजन नाही, तर ती अध्यात्माकडे नेणारी साधना आहे. याच भावनेने नृत्यकलेत सातत्याने साधना करणाऱ्या सृजन नृत्य संस्था, कल्याणच्या संस्थापिका, संचालिका व नृत्यगुरु सुजाता जोशी यांना अलीकडेच जगन्नाथपुरी (ओडिशा) येथे पार पडलेल्या इंडिया थिएटर ऑलिंपियाड - आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवात प्रतिष्ठित राष्ट्रीय स्पर्धेत मानाचा ‘दरुब्रह्म’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘दरु’ म्हणजे साधं लाकूड, ज्यातून मूर्ती घडते आणि देवत्व प्रकटतं; तर ‘ब्रह्म’ म्हणजे परमेश्वराची गूढ व अनंत अभिव्यक्ती. नृत्य आणि संगीत हीच ती साधना जी कठोर परिश्रमांना अनंताशी जोडते. त्यामुळे हा पुरस्कार हा केवळ एका नृत्यगुरुचा सन्मान नसून त्यांच्या नृत्यप्रवासातील गुरुत्व, गहनता आणि सर्जनशीलतेची राष्ट्रीय स्तरावर झालेली दखल आहे.
या स्पर्धेत गट, त्रिकूट, युगलगीत आणि सोलो प्रकारांबरोबरच सब-ज्युनियर, ज्युनियर, सिनियर व ओपन अशा सर्व कॅटेगरींमध्ये कत्थक, भरतनाट्यम् व लोकनृत्य या तिन्ही शैलींमधून सृजन नृत्य संस्थाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय प्रथम क्रमांक पटकावला. विशेष उल्लेखनीय म्हणजे, सुजाता जोशी यांच्या कथ्थक सोलो - "शिव तांडव" या प्रभावी सादरीकरणालाही राष्ट्रीय प्रथम क्रमांक मिळाला. राष्ट्रीय स्तरावर मिळालेलं हे यश सृजन नृत्य संस्था व सुजाता जोशी यांच्या अखंड साधनेचं आणि भारतीय संस्कृतीच्या परंपरेशी असलेल्या निष्ठेचं द्योतक आहे.
Post a Comment
0 Comments