ब्लॅक अँड व्हाईट कल्याण ( गीता गायकर/ऐनकर)
सलग 2 ते 3 दिवस पावसाचा जोर वाढत असल्याने भात शेतीच मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यताआहे.भाताच्या रोपाला कोंब आल्याने भात तयार होण्याच्या प्रक्रियेत आहे आणि पावसाने जोर मारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला खास वरुणराजा हिसकावून घेतो की काय अशी चिंता शेतकऱ्यांना वाटते.भात पेरणीपासून ते लावणीपर्यंत योग्य पद्धतीत पार पडल्याने आता फक्त भात झोरणी आणि धान्य घरात आणणे एवढंच बाकी असताना हा वरुणराजा सतत पडत राहिल्याने भात शेतीच मोठ्या प्रमाणात नुकसान होईल .बि- बीयाने खत,मजुरी हे शेतकऱयाला पडवणाऱ्या पलीकडे आहे तरी शेतकरी उत्तम प्रकारे शेती करतो.पण आता तयार होत चाललेल्या भाताला उन्हाची गरज असताना पावसाने जोर मारला त्यामुळे हाताशी आलेला भात मातीमोल होत की काय अशी चिंताजनक परिस्थिती शेतकऱ्यांची दिसत आहे.
Post a Comment
0 Comments