ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वार्ताहर
आदर्श मुंबई संचलित महाराष्ट्र न्यूज 18 पोर्टल चॅनल पंचरत्न मित्र मंडळ व ओंकार अकॅडमी ऑफ आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श मुंबई फाऊंडेशनचा १०वा वर्धापन दिन सोहळा नुकताच मुंबई येथे विकास कॉलेज सभागृह येथे पार पडला.कार्यक्रमात मुंबई युवा कला महोत्सव २०२५' चे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. या प्रसंगी महाराष्ट्रातील आदर्श समाज सेवक तसेच कारगिल युद्धात प्राणपणाने लढलेल्या सैनिकांचा विशेष सत्कार करण्यात आला. यात बालकांनी सुंदर नृत्य व गायन सादर केले. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निःस्वार्थ समाज सेवकांना इंडियन एक्सेलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तर विक्रोळी येथील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिम विधानसभा संघटक,मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थापक अध्यक्ष श्री.यशवंत विठ्ठल खोपकर यांना आदर्श लोकसेवा इंडियन एक्सलन्स अवॉर्ड-२०२५ ने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सन्मा. सुधीर सावंत माजी खासदार (निवृत्त ब्रिगेडीअर), मान रविंद्र मालुसरे अध्यक्ष मुंबई मराठी वृत्तपत्र संघ, सौ. सुवर्णाताई करंजे शिवसेना उपनेत्या, श्री उपेंद्र सावंत मा नगरसेवक, प्रसिद्ध कोळी गीत गायक संतोष चौधरी (दादूस), श्री संतोष शिकतोडे प्रसिद्ध समाज सेवक तसेच प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक मान.सागर नटराज, श्री.अशोक भोईर, संपादक संजय भोईर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून वेगवेगळे पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येतो. यावर्षी ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू व्यक्ती, विद्यार्थी, रुग्णांना, दिव्यांग, जेष्ठ नागरिक यांना सातत्याने मदतीचा हात देत वैद्यकीय उपचारसाठी सहकार्य करणाऱ्या विक्रोळी पार्क साईट येथील समाजसेवक, मुक्त पत्रकार याना विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या शुभ हस्ते विकास हायस्कूल सभागृह, विक्रोळी पूर्व येथे आदर्श लोकसेवा इंडियन एक्सलन्स अवॉर्ड-२०२५ रविवारी (१४ सप्टेंबर )देऊन सन्मानित करण्यात आले.या पुरस्कार साठी संस्थेनेसामाजिक,शैक्षणिक,पत्रकारिता,साहित्य,वैद्यकीय,क्रीडा आदींचा समावेश केला आहे.सामाजिक कार्य क्षेत्रातून यशवंत खोपकर यांनाआदर्श लोक सेवा तर त्यांच्या संस्थेला उत्कृष्ट संस्था पुरस्कार दिला.गेली अनेक वर्ष यशवंत खोपकर आणि त्यांची संस्था पदाधिकारी, सदस्य, सभासद आणि हितचिंतक मुंबई सह मुंबई पूर्व -पश्चिम उपनगर, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना, दिव्यांग, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, विविध रुग्णालयात उपचार मिळवून देण्यासाठी सेवाकार्य करत आहेत.तसेच दिव्यांग रुग्णांना कृत्रिम हात पाय देऊन त्यांना स्वबळावर उभे करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.यशवंत खोपकर आणि मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्था याना या सेवा कार्यासाठी यापूर्वीही विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.त्यांच्या याच कार्याचे कौतुक म्हणून त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले असे आयोजकांकडून सांगण्यात आले.शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थापक अध्यक्ष यशवंत विठ्ठल खोपकर, सचिव संदीप चादीवडे दौलत बेल्हेकर , वसंत घडशी, गंधाली मयेकर, राजेंद्र पेडणेकर, संतोष चादे, सुनील पिंपळे, विश्वास तेली, राजेंद्र चिखलकर, संतोष होलब, यांच्या सहकार्यने यशवंत खोपकर सातत्याने विविध उपक्रम राबवत असतात. त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अनेकांनी त्यांना अभिनंदनसह शुभेच्छा दिल्या आहेत
Post a Comment
0 Comments