ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
केडीएमसीच्या मुख्यालयात अनेकदा राडे झाले आहेत. याच राड्यावरुन पालिका प्रशासनाला लक्ष्य केले गेले आहे होते. त्यामुळे पालिका मुख्यालयात येत असताना कोणत्याही प्रकारचे अग्नीशस्त्र बाळगू नये असा नियम काढला गेला होता. मात्र आज केडीएमसीत काही विषयावर आयुक्तांसोबत बैठक होती. या बैठकीसाठी स्थानिक काही नेते मंडळी आली होती.त्यांच्यासोबत अग्नीशस्त्रे घेऊन काही अंगरक्षक मुख्यालयात परिसरात उघडपणे फिरताना दिसली. त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडल्यास त्याचा जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत केडीएमसीच्या उपायुक्त वंदना गुळवे यांना पत्रकारांनी विचारणा केली महापालिका आवारात अग्नीशस्त्रे घेऊन येण्याची पवानगी आहे का? त्यावर त्यांनी सांगितले की, आम्ही माहिती घेऊन सांगतो.
दरम्यान लाखो रुपये खर्च करून केडीएमसी मुख्यालयातील दोन्ही इमारतींमध्ये मेटल डिटेक्टर यंत्रणा लावण्यात आली होती. मात्र ही यंत्रणा धूळखात बंद पडली असल्याने केडीएमसी सुरक्षा यंत्रणेचे पुरते वाभाडे निघत आहेत. एखादा अनुचित प्रकार घडल्यास याला जवाबदार कोण सुरक्षारक्षक की प्रशासन असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Post a Comment
0 Comments