Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

" रेनी कार्निवल" संवाद तरूणाईचा कार्यक्रमाचे आयोजन


समता  संघर्ष संघटन व समता संघर्ष संस्कृतिक मंच च्या वतीने विद्यार्थी युवकांच्या कलागुणांना मिळणार वाव

         ब्लॅक अँड व्हाईट भिवंडी / गीता गायकर/ऐनकर 

शिव,बिरसा, फुले,शाहू,आंबेडकरी चळवळ  अधिक गतिमान करण्यासाठी आजचे युवक, युवती एकत्र येऊन काम करणे खूप गरजेचे आहे. तसेच त्यांच्या

कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांना विचारमंच उपलब्ध  करून देण्यासाठी समता -संघर्ष संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने  शिव,बिरसा, फुले,शाहू,आंबेडकरी विचारधारेवर आधारीत विशेष युवकांसाठी  "रेनी कार्निवल"  संवाद तरूणाईचा या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि १४ सप्टेंबर २०२५ रोजी भिवंडी तालुक्यातील पडघा पाच्छापूर रोड जवळील दोंदे फार्म हाऊस  येथे  ठीक सकाळी ९.३० ते सायं. ५.३०  वाजता करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष असून कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका कार्यकारी संपादक ,वृत्तपत्र लेखक उत्तम जोगदंड आहेत.तर  प्रमुख पाहुणे म्हणून लेखिका, पटकथा लेखिका, महामानवाची गौरवगाथा आणि फुलराणी या टीव्ही मालिकांची संवाद लेखिका शिल्पा कांबळे  उपस्थित राहणार असून तरुणांशी संवाद साधणार आहेत.

 यात ठाणे जिल्ह्यातील तरुण, तरूणी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कविता, गाणी, समुहगिते, एकपात्री, समुह-संवाद गृप चर्चा, संसद-संवाद अशा विविध कला सादर करणार आहेत. शिव, बिरसा,फुले, शाहू ,आंबेडकर चळवळ जिवंत ठेवणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी तरुणांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. महामानवांच्या विचारांचा रथ पुढे नेऊन चळवळ जिवंत ठेवली पाहिजे. तसेच तरुण कार्यकर्त्यांच्या मनातील भावना  मुक्त होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर कार्यक्रमात सर्वांनी सहभागी  होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments