Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण मधील सिटी पार्क येथे इनरव्हील क्लब ऑफ कल्याण तर्फे ध्यानकेंद्राचे लोकार्पण

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
कल्याण मधील सिटी पार्क येथे इनरव्हील क्लब ऑफ कल्याण तर्फे शहरातील नागरिकांसाठी शांततामय व स्वास्थ्यदायी उपक्रमाचा मंगळवार, दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी शुभारंभ करण्यात आला. सिटी पार्क येथे ध्यानकेंद्र व वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले असून ही जागा सर्वसामान्यांसाठी सकाळी आणि सायंकाळी उपलब्ध राहणार आहे.


या केंद्राचा उद्देश नागरिकांना दैनंदिन तणावातून मुक्त होण्यासाठी ध्यानसाधनेची संधी उपलब्ध करून देणे तसेच वाचनाद्वारे ज्ञानवृद्धी घडविणे हा आहे. या ठिकाणी नागरिकांना त्यांच्या सोयीने ध्यानसत्रे घेता येतील, तसेच वाचनालयात विविध विषयांवरील पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.



इनरव्हील क्लब ऑफ कल्याणच्या गतवर्षीच्या अध्यक्षा डॉ अर्चना सोमाणी यांना कल्याण परिसरात सुशोभीकरणासहित लोकोपयोगी उपक्रम करण्याविषयी तळमळ होती. त्यांच्या कारकीर्दीत या ध्यानकेंद्र बांधणीचे कामकाज सुरू झाले होते. प्रमुख पाहुणे क.डों.म.पा. आयुक्त श्री अभिनव गोयल, विशेष अतिथी शहर अभियंता सौ अनिता परदेशी, उपायुक्त श्री संजय जाधव, सिटी पार्क व्यवस्थापक श्री विजय इंगळे, इनरव्हील व रोटरी सदस्य यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला. उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी इनरव्हील क्लब ऑफ कल्याणच्या या सामाजिक उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले. त्यांनी नमूद केले की, "आजच्या जलद जीवनशैलीत मानसिक आरोग्यावरील लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आणि या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना नवी सकारात्मक ऊर्जा मिळणार आहे."

इनरव्हील क्लब ऑफ कल्याणच्या माजी अध्यक्षा डॉ अर्चना सोमाणी व सचिव अ‍ॅड नीता कदम यांनी हे ध्यान केंद्र उभारण्याची संधी दिल्याबद्दल कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसेच सिटी पार्क चे व्यवस्थापक विजय इंगळे यांचे तसेच हे काम पूर्णत्वास आणण्यासाठी मदत करणार्‍या सर्वांचे विशेष आभार मानले.


Post a Comment

0 Comments