नरेंद्र मोदींच्या मातोश्रींच्या अपमानजनक
व्हिडिओचा केला निषेध
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्रींचा अपमानजनक एआय व्हिडिओ तयार करून काँग्रेसने राजकारणातील नीचांकी व घृणास्पद स्तर गाठला आहे. याआधीही मोदींना अपमानास्पद भाषेत लक्ष्य करण्यात आले होते. मातृशक्तीचा असा अपमान झालेला आम्ही कदापी सहन करणार नाही असा इशारा देत याच्या निषेधार्थ आज भाजपा महिला मोर्चा, कल्याण जिल्हा तर्फे कल्याण पूर्व येथील 'ड' प्रभाग कार्यालया जवळ जोरदार आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांच्या सोबत भाजप प्रदेश सचिव प्रिया शर्मा, मनीषा केळकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी, जिल्हा सरचिटणीस प्रीती दीक्षित, अर्चना सूर्यवंशी, माजी परिवहन सभापती सुभाष म्हस्के, रुपाली लठ्ठे, मंडळ अध्यक्ष संतोष शेलार, विजय उपाध्याय, आतिष चौधरी, महिला मोर्चा मंडळ अध्यक्षा हेमलता पावशे, माजी नगरसेवक विकी तरे, प्रिया जोशी, भावना मनराजा, पौर्णिमा जाधव, वंदना मोरे, मोना शेठ, प्रिया जाधव तसेच असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
काँग्रेसचा हा प्रकार अमानुष, असंवेदनशील आणि मातृत्वाचा अवमान करणारा आहे. अशा नीच वर्तनाचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. देशातील जनतेनेही या प्रकारची जनताद्रोही व मातृशक्तीचा अपमान करणारी वृत्ती असलेल्या काँग्रेसला धडा शिकवावा, ही आमची ठाम भूमिका आहे. मातृशक्तीचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा यावेळी भाजपाच्या वतीने देण्यात आला.
Post a Comment
0 Comments