ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सन 2025 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रारुप प्रभागांच्या भौगोलीक सीमा प्रसिध्द करण्यासाठी आणि त्यावर हरकती, सुचना मागविण्यासाठी शुक्रवार दि.22 ऑगस्ट ते गुरुवार दि. 4 सप्टेंबर रोजी दुपारी 3 पर्यंत कालावधी देण्यात आला होता. यावर एकुण 264 हरकती व सुचना प्राप्त झाल्या. या हरकती व सुचनांच्या सुनावणीसाठी राज्य शासनाने दिपेंद्र कुशवाह, विकास आयुक्त (उद्योग) उद्योग संचनालय, महाराष्ट्र शासन यांना प्राधिकृत केले आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज महापालिका भवनातील मा.स्थायी समिती सभागृहात प्राप्त झालेल्या हरकतींवर प्रत्यक्ष सुनावणी घेण्यात आल्या. यावेळी महापालिका आयुक्त अभिनव गोयल, निवडणूक विभागाचे उपआयुक्त रमेश मिसाळ, सहाय्यक संचालक नगररचना संतोष डोईफोडे, महापालिका सचिव किशोर शेळके, नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे, सचिन घुटे, नगररचना विभाग आणि निवडणूक विभागातील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments