प्रभाग क्र 6 व 7 च्या प्रभाग रचनेबाबत
नागरिकांची हरकत
रंजना शर्मा यांनी केडीएमसीच्या निवडणूक
विभागाकडे नोंदवली हरकत
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्र. 6 व 7 च्या प्रभाग रचनेबाबत नारीकांची हरकत असून बेतूरकरपाडा परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या रंजना शर्मा यांनी 50 हून अधिक नागरिकांच्या स्वाक्षरीसह कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाकडे हरकत नोंदवली असून या प्रभाग रचनेत योग्य तो बदल न केल्यास केडीएमसीच्या आगामी निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली असून या प्रारूप रचने बाबत नागरिकांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने बेतूरकर पाडा परिसरातील नागरिकांनी देखील हरकत नोंदवली असून गेल्या दहा वर्षापासून प्रभाग हद्दीवरून जो-अन्याय होत आला आहे तोच गैरप्रकार यावेळीही होत असल्याचे सांगत हरकत नोंदविण्यात आली आहे.
प्रभाग क्र. 6 व 7 यांच्यातील हद्दीबाबत स्पष्टता दिसत नाही. पंचमुखी मारुती मंदिर जवळून व्हिनस रेसिडेन्सी घेऊन, तसेच साई विठ्ठल टॉवर वगळून गावदेवी रोड ते V-10 सोसायटी पर्यंत असा उल्लेख आहे. हि हद्द प्रत्येक्षात पाहाणी केल्यास भिकारी भैय्या, जीतसिंग चाळ, जय संतोषीमाता, श्रीकृष्ण दर्शन सोसायटी हा परिसर यापूर्वी याच वादात राहिला. या परिसरांच्या मतदारांची नावे लगतच्या त्यावेळचा प्रभाग क्र. 23 फ्लॉवरव्हॅली मध्ये गेली. ज्या जागेवर नागरिकांची घर आहेत ती जागा लगतच्या प्रभाग क्र. 28 मध्ये गेली, त्यामुळे विविध विकास कामे करताना दोन्ही प्रभागांचे लोकप्रतिनिधी हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करित होते, त्यामुळे कोणतीही ठोस विकास कामे झाली नसल्याचा आरोप या नागरिकांनी केला आहे.
त्यामुळे मागील वाईट अनुभव लक्षात घेता तसेच प्रारूप रचनेत प्रभाग क्र. 6 व 7 मधिल हद्दीची प्रत्येक्ष पाहणी केली असता हि हद्द कोणतीही कायदेशिर व नैसर्गिक नियम नं पाळता मतदारांवर अन्याय करणारी आहे. एकाच चाळीचे विभाजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रारूप प्रभाग रचनेत प्र. क्र. 6 व 7 मध्ये हरकत घेतली असून हे विभाजन प्रभाग क्र. 6 करिता बिर्ला कॉलेज रोड श्रध्दासदन घेऊन नानक अपार्टमेंट वगळून शेलार रेसिडेन्सी ते हिना आशिष या १५ मी. रुंद डीपी रोडने क्वॉलिटी कंपनी घेऊन, गावदेवी मंदिर घेऊन, साई विठ्ठल टॉवर घेऊन, गावदेवी रोड ने V-१० सोसायटीपर्यंत असा घेतल्यास मतदारांना न्याय मिळणार आहे.
मतदानांचा टक्का वाढवा तसेच निकोप लोकशाही मजबूत व्हावी याकरिता प्र. क्र. 6 व 7 मधिल हद्दीत स्पष्टता ठळकपणे दिसणे आवश्यक आहे. हि बाब अत्यंत गंभीर असून याबबत प्रत्यक्ष पाहणी न करता परस्पर निर्णय घेऊन पुन्हा मतदारांवर अन्याय केल्यास मतदानावर बहिष्कार का टाकु नये ? असा सवाल या नागरिकांनी उपस्थित केला आहे.
Post a Comment
0 Comments