32 टन निर्माल्य झाले संकलित
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
जल प्रदुषण टाळण्यासाठी आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार ६ फुटापेक्षा कमी उंचीच्या श्री गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम विसर्जन तलावात, कृत्रिम विसर्जन स्थळी करावे, अशा कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी केलेल्या आवाहनानुसार, कल्याण डोंबिवली परिक्षेत्रातील ५ दिवसांच्या श्री गणेश मुर्तीचे विसर्जनासाठी श्री गणेश भक्तांनी व नागरिकांनी महानगरपालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांनाच विसर्जनासाठी प्राधान्यक्रम दर्शविला.
कृत्रिम तलावात आपल्या गणेश मूर्ती विसर्जन करणाऱ्या गणेश भक्तांचे, महापालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच काही प्रभागात या गणेश भक्तांना सन्मानपत्र देऊन प्रोत्साहित करण्यात आले. केडीएमसी क्षेत्रात रविवारी रात्री पर्यंत 7419 शाडु मुर्तींचे आणि 10752 पीओपी मुर्तीचे अशा एकूण 18171 श्री गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात आले. यासाठी महापालिकेने सर्व प्रभागातील विसर्जन स्थळांवर कृत्रिम विसर्जनासाठी निर्माल्य कलश, अग्निशमन यंत्रणा, वैद्यकीय पथक, डस्टबिन इत्यादी व्यवस्था चोख ठेवली होती.
रविवारी सर्व विसर्जन स्थळी निर्माण झालेले सुमारे 32 टन निर्माल्य मा.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांचा खत प्रकल्प, गणेश मंदिर डोंबिवली येथील खत प्रकल्प तसेच महापालिकेचे बायोगॅस प्रकल्प व खत प्रकल्प येथे पाठविण्यात आले. तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपआयुक्त समीर भूमकर यांनी इतर अधिकाऱ्यांसमवेत स्वत: विसर्जन घाटांवर, स्थळांवर जावून विसर्जन प्रक्रियेची पाहणी केली.
Post a Comment
0 Comments