Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

स्वामी विवेकानंद संस्थेचा उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते सन्मान

 

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी नियोजन भवन,  जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभप्रसंगी ठाणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय व देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा भव्य-दिव्य असा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदर पुरस्कार सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार नरेश म्हस्के साहेब, ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ (आय.ए.एस) साहेब यांच्या शुभहस्ते शहापूर तालुक्यातील स्वामी विवेकानंद संस्था पाली या संस्थेला महाराष्ट्र क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे द्वारा ठाणे जिल्हा युवा संस्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ठाणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी साहेब (आय.पी.एस.), ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे साहेब, तहसीलदार डॉ. संदीप माने साहेब, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, मेरा युवा भारत ठाणे जिल्हा युवा अधिकारी मनीषा शर्मा, राज्य युवा पुरस्कार सन्मानित अजित कारभारी आदी मान्यवर उपस्थित होते. सदर जिल्हा युवा संस्था पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील म्हसकर, सचिव संजय तरणे, संस्थेचे हितचिंतक प्रकाश गोंधळी, दिलीप भोईर, बाळाराम भोईर, शर्वरी तरणे, रत्नदीप म्हसकर, आकाश म्हात्रे यांनी स्वीकारला. 

“स्वामी विवेकानंद संस्था गेली २८ वर्षे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा व आरोग्य पर्यावरण संरक्षण व संवर्धन, युवा व महिला विकास आदी क्षेत्रात निस्वार्थपणे व प्रामाणिकपणे मोलाचे कार्य करत असून संस्थेच्या आम्हां सर्व पदाधिकारी व सदस्यांना याचा सार्थ अभिमान वाटतो. या पुरस्काराच्या रूपाने आम्हांला संस्थेचे हे देशसेवेचे कार्य पुढे नेण्यासाठी प्रेरणा मिळाली असून खूप आनंद होत आहे. यापुढेही संस्थेच्या माध्यमातून आम्हीं सर्व समाजविकास व राष्ट्रविकासासाठी असेच भरीव कार्य करत राहू,” असे स्वामी विवेकानंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील म्हसकर यांनी पुरस्कार स्वीकारताना म्हटले. आदिवासी, दुर्गम व ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या स्वामी विवेकानंद संस्थेला शासनातर्फे सदर ठाणे जिल्हा युवा संस्था पुरस्कार मिळाल्याने संस्थेचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments