भाजपा आणि ओम गणपती मित्र मंडळाचे आयोजन
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय परिषद सदस्य तथा नगरसेवक शैलेश धात्रक यांच्या पुढाकाराने आणि भारतीय जनता पार्टी व ओम गणपती मित्र मंडळाच्या वतीने आयोजित भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन डोंबिवली पश्चिमेला करण्यात आले होते. या दहीहंडी उत्सवात कल्याण डोंबिवली, ठाण्यासह मुंबईच्या गोविंदा पथकांनी हजेरी लावत सलामी दिली.
याठिकाणी सलामी देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकावर बक्षिसांचा वर्षाव करण्यात येत होता. येथील हंडी फोडणाऱ्या महिला आणि पुरुषांच्या गोविंदा पथकाला प्रत्येकी 22 हजार 222 रुपयांचे प्रथम पारितोषिक आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या उत्सवात मनोरंजनासाठी मराठी कलाकारांच्या ऑर्केस्ट्राचे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक शैलेश धात्रक, नगरसेविका मनीषा धात्रक, युवा नेतृत्व पूजा धात्रक यांच्यासह इतर अनेक मान्यवर, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, सामान्य नागरिक यावेळी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments