भाजपा कल्याण ग्रामीण महिला उपाध्यक्ष
सोनी क्षीरसागर यांचे पोलीस आयुक्तांना पत्र
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
गेल्या तीन वर्षांपासून मोक्का फरार आरोपी माजी नगरसेवक कुणाल पाटील आणि त्यांचे दोन बंधु अनिल पाटील व मयुर पाटील हे कल्याण शहरामध्ये मोकाट फिरत असुन देखील पोलिस प्रशासन यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई का करत नाही? असा सवाल करत त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या कल्याण ग्रामीण महिला उपाध्यक्षा सोनी क्षीरसागर यांनी ठाणे पोलीस आयुक्तांकडे निवेदंनाद्वारे केली आहे.
या प्रकरणाचे मुख्य तपासक अंबरनाथ सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश काळे यांना दिनांक 6 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्षात भेटून त्यांना आरोपीचे कल्याण शहरामध्ये वावरत असलेले फोटो दिले होते. व त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली होती. तरी देखील त्यांना आजपर्यंत अटक करण्यात आलेली नाही. आताच काही दिवसांपुर्वी मोक्का फरार आरोपी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी शासनाच्या कल्याण डोंबिवली महानगपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांची आयुक्त कार्यालयात भेट घेतली. तरी देखील पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
त्यामुळे एक न्याय नगरसेवकाला आणि सर्वसामान्यांना एक न्याय अशी भावना नागरिकांमध्ये असून यावरून सर्व सामान्यांचा पोलिस प्रशासनावरून विश्वास उडेल त्यामुळे पाटील यांना त्वरित अटक करण्याची मागणी क्षीरसागर यांनी केली आहे.
Post a Comment
0 Comments