ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने क्रांतिकारकांच्या कथा दिव्यदृष्टी (अंध) असलेल्या मुलांना वाचायला मिळाव्या यासाठी डॉ विंदा भुस्कुटे लिखित ' क्रांतीगाथा भाग १' या ब्रेल लिपीतील पुस्तकाचे प्रकाशन सेंट मेरीज हायस्कूल कल्याण पूर्व येथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्राचार्या प्रेरणा सिंग मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहणाने करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत, देशभक्तीपर गीते, एन.सी.सी कॅडेट्सनी केन कवायत आणि देशभक्तीचे प्रतिबिंब दाखविणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि अखंड वाचनयज्ञचे संकल्पनाकार डॉ.योगेश जोशी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या क्रांतीगाथा भाग १ - डॉ. विंदा भुस्कुटे लिखित पुस्तकाच्या ब्रेल आवृत्तीचे प्रकाशन आर्य ग्लोबल संस्थेचे चेअरमन व एज्युकेशन टुडे फाऊंडेशनचे अध्यक्ष भरत मल्लीक व दिव्यदृष्टी असलेला सुश्रुत अंकुश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सुश्रुतने या पुस्तकातील क्रांतिवीर सावरकर यांच्या ब्रेल लिपीतील कथेचे वाचन केले. या निमित्ताने पुन्हा एकदा सेंट मेरीज हायस्कूलमध्ये नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील 'सर्वसमावेशक शिक्षण' या संकल्पनेचे स्वरूप अनुभवण्यास मिळाले. यापूर्वी देखील सेंट मेरीज शाळेत प्रौढ शिक्षण कार्यक्रम,वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण वृद्धाश्रमातील ९२ वर्षांच्या सौ.नलिनी गोखले आजी यांच्या हस्ते तसेच शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमात तृतीयपंथी डॉ.योगी नाम्बियार यांचे मानसिक आरोग्यावर मार्गदर्शन यासारख्या कार्यक्रमांतून 'सर्वसमावेशक शिक्षण' या संकल्पनेचे दर्शन घडले होते.
आर्या ग्लोबल संस्थेचे चेअरमन व एज्युकेशन टुडे फाऊंडेशनचे अध्यक्ष भरत मल्लीक यांनी आपल्या भाषणातून तंत्रज्ञानाचा मर्यादित वापर स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास साधून आत्मिक आनंद मिळवण्याचा प्रयत्न करण्याचा संदेश विद्यार्थ्यांना दिला तसेच पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करून पृथ्वीला वाचवण्याचा विचार मांडला. तसेच सी. इ. ओ डॉ विंदा भुस्कुटे यांनी क्रांतीगाथा पुस्तकाच्या लेखन अनुभवाबाबत सांगून, डोळ्यांवर बोलू काही या पुस्तकाच्या निमित्ताने नेत्रदानाचे महत्त्व सांगून सर्वसमावेशक शिक्षणाचे महत्त्व सांगितले. सदर उपक्रमाचे प्रणेते डॉ योगेश जोशी यांनी पुस्तकाच्या निर्मितीबाबत माहिती देऊन अखंड वाचनयज्ञ विषयी उपस्थितांना माहिती दिली. तसेच शाळेच्या प्राचार्या प्रेरणा सिंग यांनी स्वातंत्र्य हा हक्क आहे आणि सर्वसमावेशक शिक्षण हे आपले कर्तव्य आहे हा विचार सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला. या प्रसंगी पै फ्रेंड्स लायब्ररीचे संस्थापक पुंडलिक पै, अवयवदान चळवळीचे नागराजन अय्यर, संपादक प्रा नागेश हुलवळे, सी ए जयश्री कर्वे, आरती मुळे, हिरामण क्षीरसागर, गणपत घुले, नारायण पाटील, किरण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते अशी माहिती अक्षरमंच प्रतिष्ठानचे सचिव हेमंत नेहते यांनी दिली. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्याधर भुस्कुटे, गीता जोशी, संपदा पळनीटकर, सुकन्या जोशी, जयश्री कुलकर्णी, प्रा डॉ प्रकाश माळी, स्नेहांकित हेल्पलाइन यांनी विशेष सहकार्य केले.
Post a Comment
0 Comments