Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण-डोंबिवलीत मोकाट कुत्र्यांचा चार महिन्यात ८ हजार ७८९ नागरिकांना चावे

 

केडीएमसी क्षेत्रातील भटक्या मोकाट

कुत्र्याचा प्रश्न ऐरणीवर

वर्षांला 1 कोटी 18 लाख 68 हजार

रुपये खर्च

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

केडीएमसी क्षेत्रात भटक्या मोकाट कुत्र्याचा उच्छाद सुरू असून चार महिन्यात 8 हजार 789 जणांना कुत्रा चावल्याचे सामारे आल्याने केडीएमसी क्षेत्रातील भटक्या मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.   कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून एप्रिल ते जुलै या अवघ्या चार महिन्यांत तब्बल ८ हजार ७८९ नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असूनकुत्रा पकडून निर्बजीकरण मोहीम राबवित त्यांचे निर्बजीकरण पुनश्च सोडले जाते. भटक्या मोकाट कुत्र्याचे निर्बजीकरण करीत भटक्या मोकाट कुत्र्याच्या संख्येला वाढीला आळा घालण्यासाठी आणि नियंत्रणासाठी महापालिकेने एका एजन्सीकडे हे काम दिले असून एका कुत्र्यमागे 989 रुपये खर्च केला जात असून वर्षांला साधरण 1 कोटी 18 लाख 68 हजार रुपये खर्च केला जात आहे. तरी भटक्या मोकाट कुत्र्याची संख्या वाढत आहे. प्रशासकिय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसारकेडीएमसी क्षेत्रात 90हजार हून अधिक कुत्र्याची संख्या असून ,पशुगणना अवहालाचे काम सुरू असून अवहालाअंती कुत्र्यांच्या  संख्येची आकडेवारी मिळेल.

 या भटक्या मोकाट कुत्र्याचा टोळी उच्छादाने बालके, जेष्ठ नागरिकांसह तरुणाईसह सर्वसामान्य देखील हैराण पेरशान झाले आहेत. तर जाणाकारांच्या मते भटक्या मोकाट कुत्र्यांना सहाजासहजी मिळणारा अन्न पुरवठा हा देखील त्यांच्या वाढीस पोषक ठरत आहे. 


कल्याण डोंबिवली महापालिका दर महिन्याला सुमारे १००० पेक्षा जास्त भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करते आणि त्यांना अँटी रेबीज लस देते. तरीही महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची संख्या आटोक्यात का येत नसावी? महापालिकेच्या रेकॉर्ड नुसार वर्षभरात साधारणपणे साडे अठरा हजार नागरिकांना भटकी कुत्री चावतात, म्हणजे एका दिवसात साधारण ५० नागरिक श्वानदंशाचे बळी ठरतात! हा सरकारी आकडा आहे. यात खाजगी इस्पितळाचा आकडा जोडलेला नाही. 

रात्री १०:०० च्या नंतर ज्यावेळी रस्त्यावर नागरिकांची संख्या कमी होते, त्यानंतर कुत्र्यांची दहशत म्हणजे काय प्रकार असतो, तो पहायला मिळतो. कामावरून परतणाऱ्यांना आणि पायी चालणाऱ्यांना या कुत्र्यांचा जात त्रास होत असतो. काळीज हेलावून जाईल इतक्या मोठ्या आवाजात नागरिकांवर भुंकणे, त्यांच्या अंगावर जाणे, झेप घेणे, गाड्यांच्या मागे धावणे, चावणे हे प्रकार सर्रास पहायला मिळतात. एक कुत्रा भुंकला की परिसरातली सगळी कुत्री त्याचे अनुकरण करतात. एकावेळी एकाच नागरिकाला लक्ष करण्याची त्यांची पद्धत वाखाणण्याजोगी असते. मात्र ज्या नागरिकावर हा प्रसंग ओढवतो त्याचे मनोबल पूर्णपणे ढासळते आणि त्याची परिणीती बी.पी. आणि हायपरटेंशनमध्ये होत असते.


कल्याण डोंबिवली महापालिकेचे प्रशासन या भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी अनेक वर्षांपासून करोडो रुपये खर्च करीत आलेली आहे. शेकडो कर्मचाऱ्यांचा स्टाफ भटक्या कुत्र्यांच्या मागे लावण्यात आलेला आहे. तरीही भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यात महापालिका प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. 

--------- पत्रकार प्रविण भालेराव. 

Post a Comment

0 Comments