ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण मधील जैन सोशल ग्रुप तर्फे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सामाजिक जबाबदारीची जाणीव म्हणून दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षीही भव्य आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.ह्या आरोग्य शिबिरात जैन समाजातील असंख्य नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
ह्या आरोग्य शिबिरात डोळे तपासणी,साठी कल्याणातील ईशा नेत्रालय ह्या हॉस्पिटलच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभले.इतकेच नाही तर डोळ्यांसंबंधी असलेल्या कोणत्याही शस्त्रक्रियेसाठी शासकीय योजनेतून प्रत्येक नागरिकाला मोफत शस्त्रक्रिया करणे साठी सहकार्य करण्यात आले.
रक्ताच्या विविध प्रकारच्या तपासण्या, हाडांमधील कॅल्शियमची पातळी तपासणी,मधुमेह तपासणी,हाडांची ठिसूळता तपासणी,मणक्याचे आजार तपासणी,अशा अनेक प्रकारच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.
यात सर्वात महत्वाचा भाग होता तो महिलांच्या आरोग्य तपासणीच्या संदर्भातील,ब्रेस्ट कॅन्सर तपासणी.ह्या विषयी आधुनिक यंत्राच्या मदतीने अवघ्या काही मिनिटांत ब्रेस्ट कॅन्सर चे निदान केले जाते.या कॅन्सरच्या आधीच्या तपासण्या ह्या अनेकदा त्रासदायक अशा पद्धतीने केल्या जात होत्या,परंतु आता आलेल्या नव्या तंत्राद्वारे ही ब्रेस्ट कॅन्सर तपासणी अवघ्या काही मीनिटांत केली जाते,ह्या संबंधी माहिती सांगताना आयोजकांकडून सांगितले गेले की कोणत्याही प्रकारचं रेडिएशन,किंवा त्रासदायक ट्रीटमेंट न करता ही तपासणी सहज केली जाते.महिलांच्या आरोग्य साठी ह्या प्रकारची आधुनिक तपासणी खरोखरच वरदान ठरणार आहे.अशी ही यंत्रणा ह्या शिबिरात उपलब्ध करून देण्यात आली.
ह्या शिबिराचा लाभ शेकडो लोकांनी घेतला.आणि आपल्या आरोग्याविषयी अनेक तपासण्या एकाच ठिकाणी करवून घेतल्या.
ह्या शिबिरासाठी आयोजक जैन सोशल ग्रुप,दिगंबर जैन मण्डल कल्याण,तसेच कल्याणातील लक्ष्मण देवराम सोनावणे महाविद्यालय कल्याण, रोटरी क्लब ऑफ कल्याण, कच्छ युवक संघ कल्याण शाखा,रोटरी क्लब ऑफ कल्याण सिटी, लायन क्लब ऑफ मोहने, लायन क्लब ऑफ कल्याण, लिओ क्लब ऑफ कल्याण.WIRC ऑफ ICAI कल्याण डोंबिवली ब्रांच.ह्या सर्व संस्थांचे विशेष सहकार्य लाभले.
ह्या भव्य आरोग्य शिबिरात समाजातील असंख्य स्वयंसेवकांनी आणि शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला.जैन ग्रुप तर्फे हा शिबिरात आरोग्य तपासणी सोबत किमान 750 लोकांना धान्यवाटप करण्यात आले.
Post a Comment
0 Comments