Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 

                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

 कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात आज ७९ वा भारतीय स्‍वातंत्र्य दिन  समारोह आयुक्‍त अभिनव गोयल यांच्याहस्‍ते ध्वजारोहणाने संपन्न झाला. यावेळी आमदार राजेश मोरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी आणि महापालिकेतील इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. यावेळी राष्ट्रगीत गायनानंतरराज्य गीताची ध्वनिफीत वाजविण्यात आली. तद्नंतर हुतात्मा स्मारकास  वंदन करण्यात आले. 



यावेळी 27 गावातील कर्मचारी वर्गापैकी एका कर्मचाऱ्यास प्रातिनिधिक स्वरूपात महापालिकेतील समावेशनाचा आदेश महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याहस्ते देण्यात आला. त्याचप्रमाणे अग्निशमन विभागात कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या कै. मधुकर कांबळे यांच्या पत्नी  पौर्णिमा कांबळे यांस सदनिकेच्या रकमेएवढा धनादेशही आयुक्त अभिनव गोयल यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्रशासन पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत उत्तीर्ण झालेल्या नवसाक्षरांपैकी एका नवसाक्षर व्यक्तीस प्रमाणपत्राचे वितरण आयुक्त यांचे हस्ते करण्यात आले.




महापालिका क्षेत्रातील खाजगी रुग्णालय आणि सोनोग्राफी सेंटर यांच्या नोंदणीनूतनीकरण कार्यपद्धती ऑनलाइन स्वरूपात होणार असून या कार्यपद्धतींचा एसओपी देखील आयुक्तांच्या हस्ते आयएमए कल्याणच्या अध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर व डॉ. प्रशांत पाटील यांस सुपूर्द करण्यात आल्या. त्याचप्रमाणे आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मिशन शक्ती कर्करोगमुक्त महिला अभियानाच्या लोगोचे  अनावरण तसेच या अभियानांतर्गत आशा सेविकांच्या रॅलीचा प्रारंभ आयुक्तांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. त्याचप्रमाणे नव्याने प्राप्त  होणाऱ्या ११ रुग्णवाहिकांपैकी ६ रुग्णवाहिकांचे लोकार्पणही आयुक्त यांच्याहस्ते करण्यात आले.





Post a Comment

0 Comments