ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली मनपाच्या अ प्रभागातील मोहने आंबिवली स्टेशन बल्याणी मार्गे टिटवाळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे पाहता रस्त्यात खड्डे कि खड्डे युक्त रस्ता अशी अवस्था असून यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्याचा जीव टांगणीला लागल्याचे यानिमित्ताने दिसत आहे.
केडीएमसीच्या ग्रामीण अ प्रभाग क्षेत्रातील मोहने टिटवाळा रस्त्यावर पडलेले खड्डे पाहता रस्त्याची दुरावस्था झाली आहे. मोहने, अंबिवली स्टेशन मार्गे बल्याणी, टिटवाळा या रस्त्याची झालेली वाताहत पाहता या रस्त्यावरून वाहन चालकांना तारेवरची कसरत करत खड्डे चुकवावे लागत आहेत. तर आप्तकालीन परिस्थितीत रायते पुल बंद झाल्यास कल्याण नगर वाहतूक देखील पर्यायी रस्ता म्हणून या रस्त्यावरून होते. कल्याण टिटवाळा या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. वाहतूकीच्या, प्रवाशांच्या सोयीच्या या रस्त्याची खड्डे पडल्याने वाताहात झाली आहे. तरी प्रशासनाचे दुर्लक्ष का असा सवाल करदाते नागरिक या निमित्ताने करीत आहेत.
बल्याणी प्रभागाचे माजीनगरसेवक मयूर पाटील यांनी संदर्भीत रस्त्याचे खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला असून अद्याप देखील कामाला गती मिळत नसल्याचे दिसत आहे. या रस्त्यावर संभाव्य अपघात घडल्यास कोणाचा जीव गेला तर जबाबदार कोण असा सवाल यानिमित्ताने उभा ठाकला आहे. नुकतेच मोहने टिटवाळा रस्ता दुरावस्था संदर्भात कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी प्रशासनाला धारेवर धरीत रस्त्यातील खड्डे बुजविण्याबाबत सांगितले. अन्यथा शिवसेना स्टाईल ने जबाब दिला जाईल असा इशारा दिला होता. अवघ्या दहा ते बारा दिवसावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे, त्यामुळे बाप्पा चे आगमन, होणार असल्याने तातडीने संदर्भीत रस्त्याचे खड्डे भरून रस्ता सुस्थितीत करावा अशी मागणी यानिमित्ताने जोर धरू पाहत आहे.
"मोहने बल्याणी टिटवाळा रस्ता खड्डे भरण्याचे काम सुरु असून, या रस्तावर ज्या ठिकाणी जास्त मोठे खड्डे पडले आहेत. त्या ठिकाणी पेव्हर बसवून रस्ता दुरूस्तीचे काम करीत असल्याचे उप अभियंता हरूण इनामदार यांनी सांगितले."
Post a Comment
0 Comments