एमडी ड्रग्स, चाकू मोबाईल जप्त
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी कल्याण पत्रीपूल परिसरात एका इमारती मध्ये छापा टाकत आरमान खान या एमडी ड्रग्स तस्कराला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून नऊ ग्रॅम एमडी ड्रग्स, चाकू, मोबाईल जप्त करण्यात आला आहे. अरमान खान याने हे एमडी ड्रग्स कुठून आणले होते ? तो कोणाला विकणार होता? त्याच्या विरोधात याआधी काही गुन्हे दाखल आहेत का ? याचा तपास महात्मा फुले पोलीस करत आहेत.
कल्याण डोंबिवली पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात कारवाई तीव्र केली आहे. गेल्या काही महिन्यात पोलिसांनी अनेक ड्रग्स तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत. डोंबिवली जवळील खोणी पलावा परिसरात असलेले ड्रग्सचे मोठे रॅकेट देखील पोलिसांनी उध्वस्त केले आहे. पोलिसांकडून अमली पदार्थ विरोधातील ही कारवाई आणखी तीव्र करण्यात आली आहे. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना कल्याण मधील रहेजा कॉम्प्लेक्स, जवळ पत्रीपूल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान एक इसम एमडी ड्रग्स विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी पत्रिपूल परिसरात सापळा रचला. याच दरम्यान पत्रीपुलाजवळील सर्वोदय सृष्टी या इमारतीमध्ये पोलिसांनी छापा टाकत, या इमारतीमधून अरमान अलीअख्तर खान या ड्रग्स तस्कराला अटक केली आहे. त्याच्याजवळून नऊ ग्रॅम वजनाचा पांढऱ्या रंगाचा एमडी ड्रग्स, चाकू, मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली.
Post a Comment
0 Comments