आगरी कोळी समाज उत्कर्ष मंडळाचे आयोजन
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
आगरी कोळी समाज उत्कर्ष मंडळाच्या वतीने कल्याणात पारंपरिक नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला. कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून एका भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
या नारळी पौर्णिमा शोभायात्रेत आसपासच्या परिसरातील आगरी कोळी बांधव पारंपरिक वेशभूषा धारण करून सहभागी झाले होते. संस्कृतिक देखावे, सजलेली होडी, बैलगाड्या, ब्रास बॅन्ड आणि मोठा सोन्याचा नारळ हे शोभायात्रेचे आकर्षण होते. मिरवणुकीत बॅन्ड, ढोल, ताशाच्या गजरात व कोळीगीतांच्या तालावर कोळी बंधु, भगिनी, आबालवृध्द नाचत कोळी पोशाखात सहभागी होऊन दर्या राजाला नारळ अर्पण करण्यासाठी सहभागी झाले होते. दुर्गाडी किल्ल्यासमोरील गणेशघाटावर दर्यासागराची व सोन्याच्या नारळाची विधिवत पूजा करून दर्याला नारळ अर्पण करण्यात आला असल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली.
Post a Comment
0 Comments