Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

दळखण आणि खर्डीतील रस्त्यांवर उमटला व्यसनविरोधाचा जागर

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खर्डी येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने दळखण आणि खर्डी गावात मादक द्रव्यांच्या व्यसनाविरुद्ध जनजागृती रॅली आणि पथ नाटकाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाद्वारे तरुणाईमध्ये व्यसनमुक्तीची जागरूकता निर्माण करण्याचा संदेश दिला गेला. स्वयंसेवकांनी गावातून घोषणाबाजी करत व्यसनमुक्तीचे महत्व सांगितले. “नशा नको – जीवनाला होकार”, “तरुणाई वाचवा – व्यसन हटवा” अशा प्रभावी घोषणा दिल्या गेल्या.

           रॅलीनंतर गावकऱ्यांसमोर सादर करण्यात आलेल्या संवेदनशील पथ नाटकाद्वारे व्यसनाचे दुष्परिणाम आणि त्यातून होणाऱ्या सामाजिक समस्या प्रभावीपणे मांडण्यात आल्या. प्रेक्षकांनी या नाटिकेला उदंड प्रतिसाद दिला.कार्यक्रमाचे आयोजन NSS चे कार्यक्रम अधिकारी प्रा. रसिका सकपाळ आणि प्रा. राहुल सोनावणे यांनी केले.

या उपक्रमात NSS स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला आणि दळखण व खर्डी परिसरातील जनतेमध्ये सकारात्मक संदेश रुजवला.सदर कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रविंद्र घोडविंदे याच्या प्रेरणेने आणि मविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. कैलास कळकटे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.हा उपक्रम नशामुक्त भारताचे स्वप्न साकारण्यासाठी एक प्रभावी पाऊल ठरला आहे.

Post a Comment

0 Comments