चालकासह मॅनेजरला बेड्या 10 महिलांची केली सुटका
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण रेल्वे स्टेशन या गजबजलेल्या परिसरात एका स्पा मसाज पार्लरमध्ये मसाज च्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा पर्दाफाश कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी केला आहे. अवंतरा स्पा नावाच्या या मसाज पार्लरवर महात्मा फुले पोलिसांच्या पथकाने छापा टाकत मॅनेजर नौशाद शेख, चालक योगेश चव्हाण, आणि भीमसिंग नाईक, या तिघांना बेडा ठोकल्या आहेत. तर या स्पा पार्लरमधून 10 पीडित महिलांची सुटका केली आहे.
कल्याण रेल्वे स्टेशन वल्लीपीर रोड या गजबजलेल्या परिसरात अवंतरा स्पा नावाने मसाज पार्लर थाटण्यात आले होते. या मसाज पार्लरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती महात्मा फुले पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवंतरा मसाज पार्लरमध्ये छापा टाकला. यादरम्यान या मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची दिसून आले. महात्मा फुले पोलिसांनी तत्काळ या मसाज पार्लरचा मॅनेजर नौशाद शेख, चालक योगेश चव्हाण आणि भीमसेन नाईक या तिघांना अटक केली.
तर या मसाज पार्लरमध्ये महिलांना कामावर ठेवून पैशांचे आमिष दाखवत महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी या मसाज पार्लरमधील 10 पीडित महिलांची सुटका केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली.
Post a Comment
0 Comments