ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले, त्यांना स्मरण करण्याचा दिवस, तमाम क्रांतीवीरांना अभिवादन करण्याचा दिवस म्हणजे 9 ऑगस्ट म्हणजेच “ *ऑगस्ट क्रांती दिन”
आज “ऑगस्ट क्रांती दिन” निमित्त महापालिकेतर्फे महापालिकेच्या मुख्यालयाच्या प्रांगणात असलेल्या हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या वेळी सहा. सुरक्षा अधिकारी सुरेश पवार यांनी उपस्थितांना ऑगस्ट क्रांती दिनाची माहिती विषद केली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात असलेल्या हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
या वेळी उपस्थित महापालिका सचिव किशोर शेळके, माहिती व जनसंपर्क विभागाचे उपायुक्त संजय जाधव, कार्यकारी अभियंता अशोक घोडे, लेखा अधिकारी राजू दराडे, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे तसेच महापालिकेचे इतर अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते. यासमयी महापालिकेचे सुरक्षा रक्षक व एम. एस. एफ चे जवान यांनी हुतात्मा स्मारकास सलामी दिली.
Post a Comment
0 Comments