ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
रक्षाबंधन निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना डोंबिवलीत हजारो महिलांनी राख्या बांधून बहीण भावाचे अतूट नात्याचा धागा बांधला. सकाळ.पासून महिलांनी त्यांच्या जाणता राजा कार्यालयात तसेच इतर अनेक ठिकाणी राखी बांधण्यासाठी गर्दी केली होती.
ज्येष्ठ महिलांपासून ते लहान मुलींचा त्यात सहभाग होता. रविंद्र चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम करत असून यंदा त्यात वाढ झाली असून हजारो महिलांनी राख्या बांधल्या. रक्षा बंधन निमित्ताने एकत्र येऊन महिलांनी प्रेमाने राखी बांधली, मी खर्या अर्थाने भाग्यवान असून एवढ्या मोठया प्रमाणात भगिनी येतात, त्यांना आपुलकी वाटते हा त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आहे. विशेष म्हणजे वयाची पंच्याहत्तरी, ते लहान मुलगी देखील त्यासाठी आली हे विशेष वाटल्याची प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली.तर महायुतीचे सरकार हे लाडक्या बहिणींवर प्रेम करणारे सरकार आहे. लाडकी बहीण योजनेसह सर्वच योजना अविरतपणे सुरू राहण्यासाठी हे सरकार काम करत असून योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळणार असल्याचे यावेळी चव्हाण यांनी सांगितले.
Post a Comment
0 Comments