ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
शहाड येथील मातोश्री वेलबाई देवजी हरिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने अवयव दान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या कल्याण शाखेचे सहसचिव नागाराजन पी अय्यर व खजिनदार डॉ. विजयसिंह परदेशी यांनी विद्यार्थ्यांना अवयव दानासंदर्भात मार्गदर्शन करून अवयव दानाचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील परीक्षा विभाग प्रमुख प्रा.के.डी. शिंदे उपस्थित होते. तसेच डॉ.अलका शिंदे, डॉ. कोमल चंदनशिवे, प्रा. संगीता सोमय्या, प्रा.सुनंदा शिंदे, प्रा. पूजा झा, प्रा. रेणुका शिंगोळे व प्रा. राजेश यादव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. कविता मांजे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सी.जी. भोईर, शाहू शिक्षण संस्था शहाडचे मार्गदर्शक व समाजसेवक डॉ. गिरीश लटके व व्यवस्थापकीय संचालक डॉ.सूर्यकांत भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
Post a Comment
0 Comments