Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती कल्याणचा वंजारी महोत्सव संपन्न


विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्यांचा वंजारी

समाज रत्न पुरस्काराने केला गौरव


               ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती कल्याण या सामाजिकशैक्षणिकसांस्कृतिक आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेच्या 37 व्या वर्धापन दिना निमित्ते आयोजित करण्यात आलेला वंजारी महोत्सव नुकताच कल्याण येथे संस्थेचे अध्यक्ष शंकरराव आव्हाड व कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर धात्रक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक जिल्हा परिषदेचे माजी सभापती  उदय सांगळे तसेच कादवा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील केदार व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी वंजारी समाजातील विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या समाज बांधवांना वंजारी समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच रमेश देशमुख यांना वंजारी समाज भूषण हा प्रतिष्ठेचा  सन्मानचिन्ह मानपत्र आणि मानाचा फेटा असे स्वरूप असलेला मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच यशोदा आव्हाड यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे यावेळी समाजातील इयत्ता दहावी बारावी आणि पदवीधर तसेच विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थी यांचा देखील प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सागर दराडे याची अमेरिकन एअर लाईन्स येथे पायलट पदावर कॅप्टन म्हणून  निवड झाल्याने त्यांचा पाहुण्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सरचिटणीस अर्जुन डोमाडे यांनी करून संस्थेचा गेल्या 37 वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला. वंजारी समाजातील विवाहसाखरपुडेदशक्रियावर्ष श्राद्ध अशा कार्यक्रमांमध्ये नाहक करण्यात येणारा खर्च तसेच इतर अनिष्ट रूढी परंपरा या बंद करण्याबाबत तसेच समाजाचे वजन करून जनजागृती करण्याकरिता   महाराष्ट्रातील सर्व वंजारी  ज्ञाती संस्थांची आणि समाजातील विचारवंत व प्रबोधनकार तसेच राजकीय नेते यांची एक राज्यस्तरीय शिखर परिषद अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीच्या वतीने  लवकरच कल्याण येथे आयोजित करण्यात येणार असल्याचे वंजारी सेवा समितीच्या वधू वर मंडळ शाखेचे अध्यक्ष निवृत्ती घुगे यांनी जाहीर केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन युवा शाखेचे अध्यक्ष संग्राम घुगे यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अविनाश सोनवणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला शाखा, युवा शाखा तसेच कार्यकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य यांनी विशेष प्रयत्न केले. श्री ज्ञानेश्वरीला साडेसातशे वर्ष पूर्ण झाले त्याचे औचित्य साधून यशोदा आव्हाड यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


Post a Comment

0 Comments