मुदत संपूनही सॅटीस प्रकल्पाचे काम
अपूर्णच
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
देशातील 100 स्मार्ट शहरांमध्ये कल्याणचा समावेश असून या स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात सॅटीस प्रकल्पाचे काम गेली अनेक वर्षे सुरु आहे. मात्र मुदत संपूनही हे सॅटीस प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. यामुळे कल्याण स्टेशन परिसराची अक्षरशः बजबजपुरी झाल्याचे चित्र दिसत आहे.
सॅटीस कामासाठी नियुक्त ठेकेदार कंपनी व महापालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे स्टेशन परिसरात घाण, कचरा, दुंर्गधी, अस्वच्छता, फेरीवाले रिक्षांची गर्दी, बेशिस्त वाहतूक, सॅटीस कामी बाधीत झालेले दुरुस्ती अभावी खड्ढेमय रस्ते विवीध समस्या, यामुळे स्टेशन परिसरात बकालपणा आला आहे. साधना हॉटेल ते बैलबाजार सर्कल रस्त्याची झालेली दुरावस्था, सॅटीस कामी बाधीत झालेला रिक्षा स्टॅण्ड पर्यायी व्यवस्था न केल्याने साधना हॉटेल येथे मुख्य रस्ता रिक्षांनी व्यापला आहे. कल्याण स्टेशन साधना हॉटेल ते बैलबाजार सर्कल हा मुख्य वाहतुकीचा रस्ता बंद आहे.
साधना हॉटेल ते बैलबाजार सर्कल रस्त्याची दुरुस्ती करून रिक्षा काळी पिवळी टॅक्सी लोखंडी बॅरेकेटीगं करुन वाहतुक सुरळीत करण्याची आवश्यकता आहे. ऐतिहासिक कल्याण शहर हे मध्य रेल्वेचे जंक्शन अत्यंत गर्दीचे रेल्वे स्टेशन आहे. सॅटीस कामी दिपक हॉटेल समोरील शौचालय बाधीत झाले असून शौचालयाची पर्यायी व्यवस्था न केल्याने प्रवासी व नागरिक उघड्यावर लघुशंका करतात हि लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळे या परिसरात साफसफाई करुन नागरीकांच्या सोयी सुविधा या करीता तात्पुरते फिरते शौचालयाची सोयी सुविधा उपलब्ध करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
सुरळीत सुरक्षीत वाहतुक व्यवस्था या करीता सक्षम वाहतुक पोलिस कर्मचारी व ट्राफिक वार्डन यांची सकाळी सात दुपारी दोन ते राञी दहा वाजेपर्यंत दोन सञामध्ये नेमणूक करण्याची आवश्यकता असून सॅटीसच्या कामामुळे प्रभावित झालेल्या सोयी सुविधा पूर्ववत करण्यासाठी व समस्या सोडविण्यासाठी रिक्षा चालक मालक असोसिएशन संघटनेने आवाज उठवित आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र आगामी गणेशोत्सव व सणासुदीचे दिवस, मुसळधार पाऊस अतिवुष्टी मूळे नागरिकांना रिक्षा सेवा विस्कळीत होऊन ञास होऊ नये म्हणून निर्दशने मोर्घा आंदोलन स्थगित करण्यात आले.
स्मार्ट सिटी महापालिका प्रशासनाने रिक्षा संघटनेला संपर्क साधून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तसेच समस्या सोडविण्याचे लेखी पञ दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित केले असल्याची माहिती रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी दिली. तर रिक्षा चालक मालक असोसिएशनच्या पञ संदर्भ नुसार सॅटीस ठेकेदार कंपनीला कामात विलंब होत असल्याबाबत आपणास दंड का आकारला जाऊ नये असे महापालिका प्रशासनाकडुन नोटीस पञ पाठविण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments