आधीच खड्ड्यांमुळे त्रस्त नागरीक
वाहतूक कोंडीमुळे मेटाकुटीला
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
तीन दिवसाच्या पावसाच्या धुमशानात कल्याण डोंबिवलीतील मुख्य रस्त्यावरील वाहतूकीचा वेग मंदवला होता. पंरतु गुरूवार सकाळ पासून पावसाची उघडीप पाहता. दोन दिवसांच्या खोळंबा झालेल्या कामांचा उरक घेण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांसह, प्रवाशी, वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे आधीच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे त्रस्त झालेले नागरिक या वाहतूक कोंडीमुळे मेटाकुटीला आल्याचे चित्र दिसत होते.
कल्याण शहरातील कल्याण स्टेशन ते शहाड कडे जाणारा रस्ता, तसेच कल्याण उल्हासनगर वालधूनी पुल रस्ता, कल्याण मुरबाड शहाड उड्डाणपूल रस्ता, इंदिरा नगर कॉर्नर, रस्ता, खडकपाडा रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते टिळक चौक रस्ता मंहमद अली चौक बाजार पेठ रस्ता सहजानंद चौक ते पत्रीपुल रस्ता, चक्कीनाका रस्ता पुना लिंक रोड हे मुख्य रस्ते गुरुवारी दुपार पासून वाहतूक कोंडी मुळे खोळंबा मार्ग बनले. रस्त्यावरील वाहनांची वाहतूक कोंडी आणि झालेल्या खोळंबा मुळे वाहतूक कोंडीत तब्बल अर्धा ते एक तास भर अडकण्याची वेळ नागरिकांवर आली.
यात कल्याण स्टेशन परिसरात सुरू असलेले कासव गतीने स्मार्ट सिटीअंतर्गत सँटीस चे काम कधी पूर्णत्वला जाणार असा सवाल यानिमित्ताने होत आहे. तर मुख्य रस्त्यांसह पोहच रस्त्यानां पडललेल्या खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे ठेकेदारांचे चागंभल करण्यासाठी गणपती बाप्पांचे आगमन खड्डे युक्त रस्त्यावरून होणार का असा सवाल सर्वसामान्य करदात्या नागरिकांकडून होत आहे.
गुरुवारी वालधुनी ते रामबाग आणि मुरबाड रोडपर्यंत भयंकर ट्रॅफिक जाम झाली होती. दोन किलोमीटरपेक्षा जास्त लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोडींत आडकलेल्या वाहन चालकांसह प्रवासी देखील हैराण झाले होते. शालेय बसेस देखील या कोंडीत अडकल्या असल्याने विघार्थी वर्गाला नाहकांचा त्रास सहन करण्याचा प्रसंग ओढावला होता. तर अनेक प्रवासी वेळेत आपल्या गंतव्यस्थानी पोहोचू शकले नाहीत. तर काही प्रवाशांनी पायपीट करण्याचा मार्ग अवलंबिला. या वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका व आपत्कालीन सेवा वाहनांनाही मार्ग काढणे कठीण झाले असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत होते.
Post a Comment
0 Comments