ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतमालाची सततच्या दोन तीन दिवसाच्या पावसामुळे आवक घटली. तसेच बाजार समितीत पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे तीन दिवसापासून घाऊक, किरकोळ खरेदीदारांनी भाजीपाला, फळ भाज्या, फळे, फुले घेण्यासाठी पाठ फिरविल्याचे दिसत होते. तर शेतमालाची आवक घटल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती वसुली उत्पन्न अर्ध्यावर आल्याने बाजार समितीला देखील फटका बसला आहे.
गेले दोन ते तीन दिवस कल्याण शहरात पडलेल्या पावसाचा फटका कृषी उत्पन्न बाजार समिती आवाराला बसला. यामुळे पावसाच्या पाण्याचा निचारा होत नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील रस्त्यावर ढोपाभर पाणी साचल्याने पाणी, चिखलाचे साम्रज्य दिसून येत होते. अखेर कृषी उत्पन्न बाजार समितीने जेसीबी लावून पाण्याचा निचारा होण्याचा मार्ग मोकाळा करीत साचलेल्या पाण्याला मार्ग करून दिला. पंरतु आज देखील कृषी उत्पन्न बाजार समितीला ढोपाभर पाण्याचा वेढा पाहता मार्केट परिसरातील सोयी सुविधा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे दिसत आहे. याच कारणामुळे किरकोळ खरेदीदार कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात खरेदी साठी पाठ फिरवत असल्याचे दिसत आहे.
Post a Comment
0 Comments